बॉश स्पेअरपार्ट चोरीप्रकरणी नगरसेवकासह राजकारण्यांची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 08:47 PM2018-01-10T20:47:42+5:302018-01-10T20:55:49+5:30
नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील बॉश कंपनीतील स्पेअरपार्ट चोरी प्रकरणात अंबड पोलिसांनी आणखी एका संशयितास बुधवारी (दि़१०) अटक केली़ या गुन्ह्यात अटक केलेल्या चौघांना न्यायालयात हजर केले असता यातील दोघांना न्यायालयीन कोठडी तर प्रमुख संशयित छोटू चौधरी व त्याच्या भावास १५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी शिवसेना नगरसेवकाचे पती बाळा दराडे यांची सुमारे दोन तास चौकशी करून जबाब नोंदविले़ तर भाजपा नगरसेवक मुकेश शहाणे व शिवसेना नगरसेवक पुत्र सचिन राणे यांनाही चौकशीसाठी बोलविण्यात आले होते़
नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील बॉश कंपनीतील स्पेअरपार्ट चोरी प्रकरणात अंबड पोलिसांनी आणखी एका संशयितास बुधवारी (दि़१०) अटक केली़ या गुन्ह्यात अटक केलेल्या चौघांना न्यायालयात हजर केले असता यातील दोघांना न्यायालयीन कोठडी तर प्रमुख संशयित छोटू चौधरी व त्याच्या भावास १५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी शिवसेना नगरसेवकाचे पती बाळा दराडे यांची सुमारे दोन तास चौकशी करून जबाब नोंदविले़ तर भाजपा नगरसेवक मुकेश शहाणे व शिवसेना नगरसेवक पुत्र सचिन राणे यांनाही चौकशीसाठी बोलविण्यात आले होते़
बॉश कंपनीतील भंगार मालाचा ठेका घेतलेला प्रमुख संशयित छोटू चौधरी याने कंपनीतील चांगले व डिफेक्टिव्ह स्पेअरपार्ट चोरून त्यातील डिफेक्टिव्ह पार्ट रिपेअर करण्यासाठी सिडकोतील पंडितनगरमध्ये तीनमजली इमारतीत कारखानाच सुरू केला होता़ बॉश कंपनीचे हे स्पेअरपार्ट तो विविध राज्यांमध्ये विक्री करून कंपनीची फसवणूक करीत होता़ ३१ डिसेंबर २०१७ ला स्थानिक नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर याची चर्चा होऊन ती पोलीस व राजकीय पुढाºयांपर्यंत पोहोचली़ यानंतर अंबडच्या एका पोलीस उपनिरीक्षकासह अन्य दोन पोलीस कर्मचारी व राजकीय पुढाºयांनी हजेरी लावून यामध्ये स्वत:चे हात ओले करून घेतल्याची चर्चा आहे़
बॉश कंपनीतील हे प्रकरण उघड होऊ नये यासाठी राजकीय हस्तक्षेप होऊन आर्थिक देवाण-घेवाणीद्वारे प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न केले गेले़ मात्र, एकमेकांवरील राजकीय राग काढण्यासाठी आलेली ही आयतीच संधी दवडण्यासाठी कोणीही तयार नसल्याने हे प्रकरण पोलिसात गेले़ विशेष म्हणजे ३१ डिसेंबरला प्रकरण उजेडात येऊनही पोलिसांनी तीन दिवसांनंतर गुन्हा दाखल केला व ११ कोटी रुपयांचे बॉश कंपनीचे स्पेअरपार्ट जप्त केल्याची माहिती दिली़ या प्रकरणात पोलिसांनी प्रथम दोन कामगारांनी अटक केली व त्यानंतर प्रमुख संशयित ताहेर अली मोहम्मद इरदीस चौधरी उर्फ छोटू चौधरी व त्याचा भाऊ परवेजअली इदरीस चोैधरी यांना अटक केली आहे़
अंबड पोलिसांनी याप्रकरणात बुधवारी शिवसेना नगरसेवकाचे पती बाळा दराडे यांची सुमारे दोन चौकशी करून जबाब नोंदवून घेतला़ तर भाजपाचे नगरसेवक मुकेश शहाणे व शिवसेना नगरसेवकपुत्र सचिन राणे यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते़ मात्र, यापैकी शहाणे यांनी महापालिकेची महासभा तर राणे यांनी शिवसेना मेळावा असल्याचे सांगितल्याने त्यांची नंतर चौकशी केली जाणार आहे़ दरम्यान, छोटू चौधरी व त्याचा भाऊ परवेज अली चौधरी यांच्या पोलीस कोठडीत १५ तारखेपर्यंत वाढ करण्यात आली आहे़ तर उर्वरीत दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे़
नगरसेवक व नगरसेवकांच्या नातेवाईकांची चौकशी
बॉश कंपनीतील स्पेअरपार्ट चोरी प्रकरणात संशयाच्या भोव-यात असलेल्या पोलिसांकडून नगरसेवक व नगरसेवकांच्या नातेवाईकांची चौकशी सुरू असून त्यांचे जाबजबाब नोंदवून घेतले जात आहेत़ मुळात नगरसेवकांसह संशयित पोलिसांची वरीष्ठ पोलीस अधिकाºयाकडून चौकशी होणे गरजेचे असताना या चौकशीतून काय निष्पन्न होणार याबाबत शंकाच आहे़ दरम्यान, या प्रकरणात सातपूर मधील एका नगरसेवकाचाही सहभाग असल्याचे तपासात समोर आले असून त्याचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे़
कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही
बॉश स्पेअरपार्ट चोरी प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून यामध्ये सर्वच संशयितांची चौकशी केली जाणार आहे़ राजकारणी असो वा पोलीस कर्मचारी असो कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही़ मुख्य सूत्रधार चौधरी हा कंपनीतून माल कसा चोरी करीत होता, त्यास कंपनीतील कोणाची साथ होती, बनावट माल कुठे विक्री केला जात होता अशा सर्वच प्रश्नांची उत्तरे त्याच्याकडून घेतली जाणार आहे़ बॉश कंपनीच्या बेंगलोर युनिटमधील अधिकारी व्हीक़ेक़दम यांनीही या प्रकरणाबाबत माहिती घेतली आहे़
- मधुकर कड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंबड पोलीस ठाणे