छत्तीसगडमधील फरार आयपीएल सट्टेबाजांना नाशिकरोडला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 10:20 PM2018-05-05T22:20:35+5:302018-05-05T22:20:35+5:30

नाशिक : आयपीएल क्रिकेट सामन्यादरम्यान लोकांकडून पैशांची बोली लावून सट्टा खेळणारे व खेळविणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील छत्तीसगड राज्यातील बिलासपूर येथील सात फरार सराईत गुन्हेगारांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिकरोड रेल्वेस्थानकावर सापळा रचून शनिवारी (दि़५) अटक केली़ या संशयितांकडून २५ महागडे मोबाइल, लॅपटॉप, पेनड्राईव्ह असा साडेचार लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे़

nashik,Chhattisgarh,absconding,IPL,bookies,arrested | छत्तीसगडमधील फरार आयपीएल सट्टेबाजांना नाशिकरोडला अटक

छत्तीसगडमधील फरार आयपीएल सट्टेबाजांना नाशिकरोडला अटक

googlenewsNext
ठळक मुद्देआंतरराज्यीय टोळी : ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नाशिक : आयपीएल क्रिकेट सामन्यादरम्यान लोकांकडून पैशांची बोली लावून सट्टा खेळणारे व खेळविणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील छत्तीसगड राज्यातील बिलासपूर येथील सात फरार सराईत गुन्हेगारांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिकरोड रेल्वेस्थानकावर सापळा रचून शनिवारी (दि़५) अटक केली़ या संशयितांकडून २५ महागडे मोबाइल, लॅपटॉप, पेनड्राईव्ह असा साडेचार लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे़

छत्तीसगड राज्यातील विलासपूर शहरात आयपीएल मालिकेदरम्यान होणाºया विविध संघांच्या सामन्यांवर लोकांकडून पैशांची बोली लावून सट्टा खेळणारे व खेळविणारे संशयित किसनचंद गोधुमल बजाज, शिवकुमार छेदीलाल साहू, मुरली अशोक लोकवाणी, विजयकुमार नारायणदास बजाज, आकाश प्रभात शर्मा (पाचही रा़ बिलासपूर, छत्तीसगड), नारायणदास माधवदास नागवाणी (रा़ रायपूर, छत्तीसगड), संजयकुमार मुरलीधर कृष्णानी (रा़ बस्तर, छत्तीसगड) यांच्यावर बिलासपूर पोलिसांनी जुगारबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल केले होते़ यानंतर हे सातही संशयित छत्तीसगड राज्यातून फरार झाल्यानंतर नाशिक व शिर्डी परिसरात येणार असल्याची माहिती बिलासपूर पोलिसांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांना दिली होती़

अधीक्षक दराडे यांना मिळालेल्या माहितीनंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक कर्पे यांनी नाशिकरोड रेल्वेस्थानकावर सापळा लावला़ या सातही संशयितांना पोलिसांनी नाशिकरोड रेल्वेस्थानकावर गीतांजली एक्स्प्रेसमधून ताब्यात घेतले़ या संशयितांची व त्यांच्या सामानाची तपासणी केली असता २५ विविध कंपन्यांचे महागडे स्मार्टफोन, डेल कंपनीचा लॅपटॉप, पेनड्राईव्ह, आयपीएल बेटिंगसाठी लागणारे सॉफ्टवेअर, अंक लिहिलेल्या डाय-या असा ४ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला़ गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेले हे सातही सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर दहा हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते़

स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेल्या या सातही संशयितांना बिलासपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले़ पोलीस निरीक्षक अशोक करपे, सहायक पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ, सहायक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ गुरुळे, रवींद्र शिलावट, पोलीस हवालदार शिवाजी जुंदरे, बंडू ठाकरे, पोलीस नाईक प्रीतम लोखंडे, अमोल घुगे, पोलीस शिपाई संदीप हांडगे, संदीप लगड, रमेश काकडे या पथकाने ही कारवाई केली़

Web Title: nashik,Chhattisgarh,absconding,IPL,bookies,arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.