सूनेला जिवंत जाळणाºया सासूला सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 04:13 PM2017-10-10T16:13:45+5:302017-10-10T16:21:33+5:30

nashik,daughter,in,law,murder,conviction | सूनेला जिवंत जाळणाºया सासूला सक्तमजुरी

सूनेला जिवंत जाळणाºया सासूला सक्तमजुरी

Next
ठळक मुद्दे परपुरुषाशी बोलते या कारणावरून सूनेसोबत वाद रॉकेल टाकून जिवंत जाळले़ दिंडोरी तालुक्यातील कापाची करंजाळी येथील घटना

नाशिक : परपुरुषाशी बोलते या कारणावरून सूनेसोबत वाद घातल्यानंतर रॉकेल टाकून जिवंत जाळणारी सासू आरोपी हौसाबाई निवृत्ती माळेकर (५५,राक़ापाची करंजाळी, ता़दिंडोरी, जि़नाशिक) हिस जिल्हा व सत्र न्यायाधीश एम़एच़मोरे यांनी मंगळवारी (दि़१०) दहा वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ या खटल्यात सरकारी वकील म्हणून अ‍ॅड विद्या जाधव यांनी काम पाहिले़
दिंडोरी तालुक्यातील कापाची करंजाळी येथील हौसाबाई माळेकर ही मुलगा विलास व सून अनिता यांच्यासोबत राहत होती़ सुनेचे परपुरुषासोबत बोलणे खटकत असल्याने त्यांच्यात नेहेमी वाद होत़ २५ एप्रिल २०१६ रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास सून अनिता ही जनावरांच्या गोठ्याची साफसफाई करीत होती़ सासू हौसाबाई हिने पुन्हा सून अनिता हिला तु परपुरुषाशी का बोलत असते कारणावरून वाद घातला़ या वादानंतर संतप्त हौसाबाईने अनिताला खेचत घरात नेले व तिच्या अंगावर रॉकेल टाकून काडी लावून पेटवून दिले व घटनेनंतर पळून गेली़
पती विलास व शेजारील नागरिकांनी पेटलेल्या अनिताला विझवून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले़ यामध्ये ६४ टक्के जळालेल्या अनिताचा उपचारादरम्यान १ मे २०१६ रोजी मृत्यू झाला़ मृत्युपुर्व जबाबात तिने सासूने पेटवून दिल्याचा जबाब दिला होता़ या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात सासूवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला़ अ‍ॅड़ विद्या जाधव यांनी १२ साक्षीदार तपासून सासूविरोधात न्यायालयात सबळ पुरावे सादर केले़ न्यायालयाने सासूला दोषी धरीत खूनाच्या गुन्ह्याऐवजी सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी धरून दहा वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़

Web Title: nashik,daughter,in,law,murder,conviction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.