दिंडोरी तालुक्यातील विळवंडीतील महिलेच्या खूनाचा उलगडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 05:07 PM2017-11-21T17:07:31+5:302017-11-21T17:09:56+5:30
नाशिक : दिंडोरी तालुक्यातील विळवंडी येथील शेतात सापडलेल्या अनोळखी महिलेच्या खूनाचा उलगडा करण्यात ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेस यश आले आहे़ अनैतिक संबंधातून मंदाबाई रानु लिलके (४१, राक़ोचरगाव) या महिलेचा प्रियकर संशयित कृष्णा केरू लिलके (२५, रा. कोचरगाव, ता.दिंडोरी) यानेच हा खून केल्याचे समोर आले असून पोलिसांनी त्यास अटक केली आहे़
नाशिक : दिंडोरी तालुक्यातील विळवंडी येथील शेतात सापडलेल्या अनोळखी महिलेच्या खूनाचा उलगडा करण्यात ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेस यश आले आहे़ अनैतिक संबंधातून मंदाबाई रानु लिलके (४१, राक़ोचरगाव) या महिलेचा प्रियकर संशयित कृष्णा केरू लिलके (२५, रा. कोचरगाव, ता.दिंडोरी) यानेच हा खून केल्याचे समोर आले असून पोलिसांनी त्यास अटक केली आहे़
विळवंडी शिवारातील पुंडलीक वाघेरे यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाखाली १२ नोव्हेंबरला एका अनोळखी महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता़ तोंडावर व कपाळावर वार तसेच मृतदेह कुजलेला यामुळे प्रारंभी या महिलेची ओळख पटत नसल्याने दिंडोरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती. मात्र, शवविच्छेदन करणाºया वैद्यकिय अधिकाºयांनी घातक हत्याराने वार केल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल दिल्याने महिलेचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते़
पोलीस अधीक्षक संजय दराडे, अपर अधीक्षक विशाल गायकवाड यांनी खुनाचा शोध घेण्याचे आदेश दिले होते़ महिलेचे वर्णनावरून ती कोचरगाव येथील मंदाबाई रानु लिलके (४१) असल्याचे पोलीस तपासात समोर आले़ ७ आक्टोबर रोजी मंदाबाई ही कोचरगाव येथुन विळवंडी येथे बाजरी विकण्यासाठी गेली होती़ पोलिसांनी सखोल माहिती घेत कोचरगाव येथील कृष्णा केरू लिलके यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने मंदाबाईच्या खुनाची कबुली दिली. मयत मंदाबाईसोबत ५ वषार्पासुन प्रेम संबंध असलेला कृष्णा लिलके हा दोन महिन्यांपासून शेतीच्या कामासाठी चांदवड तालुक्यात कुटूंबियांसोबत गेला होता़
दरम्यान, मंदाबाईचे इतर लोकांशी अनैतिक संबंध असल्याची माहिती त्यास मिळाल्याने त्या दोघांमध्ये वाद झाले होते़ कृष्णा लिलके हा ७ आॅक्टोबरला कोचरगाव आला व त्याच रात्री विळवंडी येथे मंदाबाईस भेटला होता. या ठिकाणी रात्री ते दोघे कोचरगाव येथे रस्त्याने जात असतांना दोघांमध्ये पुन्हा वाद झाले व रागाच्या भरात कृष्णा याने आंब्याचे झाडाखाली असलेला लाकडी दांडा व दगड मंदाबाईच्या डोक्यात मारून तिचा खून केल्याची कबुली कृष्णा लिलके याने पोलिसांना दिली आहे़
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक करपे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आशिष अडसुळ, मच्छिंद्र रणमाळे, रामभाऊ मुंढे, पोलीस हवा दिपक आहिरे, दत्तात्रय साबळे, पुंडलीक राऊत, हनुमंत महाले, सुधाकर खरोले, गणेश वराडे, वसंत खांडवी, अमोल घुगे, जालिंदर खराटे, पोलीस शिपाई प्रदिप बहिरम, विश्वनाथ काकड, हेमंत गिलबिले, संदिप लगड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.