नाशिकमध्ये औषध फवारणीदरम्यान शेतक-याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 09:08 PM2017-12-08T21:08:40+5:302017-12-08T21:13:28+5:30
नाशिक : कोबीच्या रोपाला औषध फवारणी करीत असताना औषधाचा त्रास होऊन साठ वर्षीय शेतक-याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि़८) दुपारी मातोरी येथे घडली़ निवृत्ती दामू पिंगळे (रा़मातोरी, दरी रोड, ता़जि़नाशिक) असे मृत्यू झालेल्या शेतक-याचे नाव आहे़ दरम्यान, या मृत्यूची नाशिक तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक शहराजवळील मातोरी-दरी रोडवर निवृत्ती पिंगळे यांची शेती आहे़ या शेतीमध्ये त्यांनी कोबीचे रोप टाकलेले असून दुपारी एक वाजेच्या सुमारास कोबीच्या रोपाला कोडायझन नावाच्या औषधाची फवारणी करीत होते़ रोपावर औषधाची फवारणी करीत असताना त्यांना औषधाचा त्रास होऊ लागल्याने त्यांचा मुलगा पोलीस पाटील रमेश निवृत्ती पिंगळे यांनी उपचारासाठी जिल्हा रुगणालयात दाखल केले होते़ त्यांच्यावर औषधोपचार सुरू असताना तीन वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉग़डे यांनी घोषीत केले़
दरम्यान, औषध फवारणीच्या औषधाचा त्रास होऊ लागल्याने पिंगळे यांना उपचारसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद रुग्णालयात करण्यात आली आहे़ तर हा मृत्यू संशयास्पद असल्याची शक्यता जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़जी़एम़होले यांनी व्यक्त केली आहे़ पिंगळे यांच्या शरीरात किटकनाशकाचे प्रमाण अधिक आढळून आल्याने विष प्राशन केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्या आला आहे़ वैद्यकीय अधिकाºयांनी व्हिसेरा राखून ठेवला असून न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.