नाशिकच्या गंगापूररोडवर २८ लाखांची रोकड लूटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 03:15 PM2018-04-03T15:15:57+5:302018-04-03T15:15:57+5:30
नाशिक : बँकेत पैसे भरण्यासाठी बँकेत गेलेल्या सराफी दुकानातील कर्मचाऱ्याला पैसे पडल्याचे सांगून त्याच्याकडील तब्बल २८ लाखांची रोकड सुमारे सात संशयितांनी लूटून नेल्याची घटना मंगळवारी (दि़३)गंगापूर रोडवरील सारस्वत बँकेसमोर घडली़ दरम्यान, लुटीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलीस या संशयितांचा शोध घेत आहेत़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (दि़३) दुपारी दीड वाजेच्या सुमारास शरणपूर रोडवरील सराफी व्यवसायिक आडगांवकर ज्वेलर्समधील कर्मचारी दुकानातील २८ लाख ६४ हजार २६८ रुपयांची रोकड बँकेत भरण्यासाठी निघाले़ गंगापूररोडवरील मॉर्डर्न कॅफेजवळील सारस्वत बँकेत या पैशांचा भरणा करावयाचा असल्याने कर्मचाºयांनी दुचाकीवरून पैसे नेले़ बँकेच्या बाहेर कर्मचारी पोहोचले असता सात संशयितांनी तुमच्याकडील दहा रुपयांच्या नोटा खाली पडल्याने सांगितले़ त्यानुसार दहा रुपयांच्या नोटा उचलत असलेल्या कर्मचा-याकडील रोकड संशयितांनी लूटून नेली़
गंगापूर रोडवरील रोकड लुटीची माहिती मिळताच पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल, सहायक पोलीस आयुक्त राजू भुजबळ, गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला़ पोलिसांनी बँकेच्या बाहेरचे तसेच परिसरताील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली़ बँकेच्या सीसीटीव्हीमध्ये हा सर्व प्रकार कैद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून या संशयितांचा शोधासाठी पथके रवाना करण्यात आले आहेत़