विवाहास नकार दिल्याचा रागातून तरुणीचा निर्घृण खून करणाºया आरोपीस जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 07:39 PM2017-09-26T19:39:37+5:302017-09-26T19:42:40+5:30

 nashik,girl,murder,life imprisonment,conviction | विवाहास नकार दिल्याचा रागातून तरुणीचा निर्घृण खून करणाºया आरोपीस जन्मठेप

विवाहास नकार दिल्याचा रागातून तरुणीचा निर्घृण खून करणाºया आरोपीस जन्मठेप

Next
ठळक मुद्देनाशिक जिल्हा न्यायालय ; तरुणीच्या शरीरावर अठरा वारपळसे येथील संत आईसाहेब विद्यालयातील रूम नंबर चारमध्ये बोलावून केले वारस्वत:च्या हाताच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप, पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने सक्तमजुरी

जिल्हा न्यायालय : विवाहास नकार दिल्याचा राग; शरीरावर अठरा वार
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : विवाहास नकार दिल्याचा रागातून उच्चशिक्षित तरुणीवर कटरने वार करून तिचा निर्घृण खून करणारा आरोपी शशिकांत शांताराम टावरे (२६, रा़ पळसे, ता़ जि़ नाशिक) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश यू़ एम़ नंदेश्वर यांनी मंगळवारी (दि़२६) जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ १८ मे २०१६ रोजी रात्रीच्या सुमारास पळसे येथील शाळेत युवतीच्या खुनाची घटना घडली होती़ या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील गायत्री पटनाला यांनी या खटल्याचे काम पाहिले़
पळसे येथील आरोपी शशिकांत टावरे व तेथीलच एमबीए झालेली ज्योती सुदाम थेटे यांच्यात मैत्री होती़ मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर २८ जानेवारी २०१६ रोजी त्यांनी विवाह नोंदणी कार्यालयात विवाहासाठी अर्जही केला होता़ मात्र, ज्योतीच्या मोठ्या बहिणीचा विवाह होणे बाकी असल्याने घरच्यांनी समजावल्यानंतर ३ फेब्रुवारीला नोंदणीचा अर्ज तूर्तास मागे घेतला होता़ या गोष्टीचा राग आलेल्या शशिकांत याने १८ मे २०१६ रोजी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास ज्योतीला तिच्या घराच्या पाठीमागील संत आईसाहेब विद्यालयातील रूम नंबर चारमध्ये बोलावून घेतले आणि कटरने अठरा वार करून तिचा खून केला़ यानंतर स्वत:च्या हाताच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला़
या प्रकरणी कुसुम थेटे यांच्या फिर्यादीवरून १९ मे रोजी नाशिकरोड पोलीस ठाण्यात शशिकांत टावरे याच्या विरोधात खून व आत्महत्येचा प्रयत्न असे गुन्हे दाखल करण्यात आले होते़ न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील गायत्री पटनाला यांनी १४ साक्षीदार तपासून आरोप सिद्ध केले तर बचाव पक्षाच्या वकिलांनी, शशिकांत व ज्योती यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा युक्तिवाद न्यायाधीशांनी फेटाळून लावला़
न्यायाधीश नंदेश्वर यांनी फिर्यादी कुसुम थेटे, मयत ज्योतीची बहीण वनिता गायधनी, शवविच्छेदन करणारे डॉ़ आनंद पवार यांची साक्ष ग्राह्य धरीत आरोपी शशिकांत टावरे यास खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप, पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने सक्तमजुरी, आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी एक वर्षे सक्तमजुरी व पाचशे रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास, अशी शिक्षा सुनावली़

Web Title:  nashik,girl,murder,life imprisonment,conviction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.