नाशिक ग्रामीणमधील किटकनाशकांची दुकाने फोडणाºया टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 05:00 PM2017-10-04T17:00:52+5:302017-10-04T17:08:11+5:30

nashik,house,breaker,gang,arrested | नाशिक ग्रामीणमधील किटकनाशकांची दुकाने फोडणाºया टोळीचा पर्दाफाश

नाशिक ग्रामीणमधील किटकनाशकांची दुकाने फोडणाºया टोळीचा पर्दाफाश

Next
ठळक मुद्देग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी साडेतेरा लाखांचा मुद्देमाल जप्त नऊ संशयितांना अटक

नाशिक : ग्रामीण भागातील किटकनाशके व औषधविक्रीचे दुकाने फोडून चोरी करणाºया टोळीचा ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून नऊ संशयितांना अटक केली आहे़ या संशयितांनी ११ घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्याकडून शेतीउपयुक्त औषधे, किटकनाशके, तवेरा कार, छोटा हत्ती वाहन, दुचाकी असा १३ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी दिली आहे़
नाशिक ग्रामीणमधील निफाड, पिंपळगाव बसवंत, दिंडोरी, वणी, वडनेर भैरव, चांदवड, ओझर या ठिकाणची पेस्टीसाईडची दुकाने रात्रीच्या सुमारास फोडून किटकनाशकांची चोरी करण्याच्या घटना वाढल्या होत्या़ अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांनी या गुन्ह्यांसाठी विशेष पथकाची निर्मिती केली होती़ या पथकाने चोरीस गेलेल्या किटकनाशकांची कंपनी, वापर होणार परिसर याची सविस्तर माहिती गोळा करण्यास सुरूवात केली होती़

पोलीस निरीक्षक करपे यांना सोमवारी (दि़२) दिंडोरी तालुक्यातील सिंदवड येथील काही तरूण कमी किमतीत किटकनाशकांची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने रात्रभर जागरण करून संशयित सोपान दिनकर बस्ते (२५, रा़सिंदवड, ता़दिंडोरी), राहुल भाऊसाहेब मोरे (२६, रा़सिंदवड, ता़दिंडोरी), सतिश अरुण मोरे (२४, राक़सबे सुकेणे, ता़निफाड, ह़मु़बहादुरी, ता़चांदवड), शुभम नामदेव गवे (१८, राख़तवड, ता़दिंडोरी, जि़नाशिक) या चौघांना अटक केली़ पोलिसांनी या चौघा संशयितांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी आपल्या पाच साथीदारांची नावे सांगून पिंपळगाव, दिंडोरी, वणी, वडनेर भैरव, निफाड, कसबे सुकेणे, मोहाडी या ठिकाणी किटकनाशकांची दुकाने फोडल्याची कबुली दिली़

पोलिसांनी चोरी करण्यासाठी वापरण्यात येणाºया तवेराचा चालक खंडेराव पोपट कडाळे (४०, रा़तिसगाव, ता़दिंडोरी), किरण अशोक गायकवाड (१८, रा़बहादुरी, ता़दिंडोरी), गुलाब निवृत्ती लांडे (२१, रा़सिंदवड, ता़दिंडोरी) यांना अटक केली असता त्यांनी चोरलेली किटकनाशके लहू शंकर बस्ते (४५, रा़सिंदवड, ता़दिंडोरी) व ज्ञानेश्वर मुरलीधर गणोरे (३०, राख़डक सुकेणे, ता़निफाड यांना कमी किमतीत विकल्याची कबुली दिली़ पोलिसांनी या नऊही संशयितांकडून चोरीची किटकनाशके व गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली वाहने जप्त केली आहे़

सव्वा तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त
ग्रामीण पोलिसांनी संशयितांकडून ७ लाख २९ हजार ५५९ रुपये किमतीची शेती उपयोगी किटकनाशके, गुन्ह्यात वापरलेली तवेरा (एमएच ०४, ईएच ४९६०), छोटा हत्ती वाहन (एमएच १५, सीके ८५५८), स्प्लेंडर दुचाकी (एमएच १५, डीडब्ल्यू ६४७१) असा १३ लाख २४ हजार ५५९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे़

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
सहायक पोलीस निरीक्षक राम करपे, पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र रणमाळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक रवि शिलावट, रामभाऊ मुंढे, पोलीस हवालदार दीपक अहिरे, हनुमंत महाले, पोलीस नाईक अमोल घुगे, जालिंदर खराटे, राजू सांगळे, पोलीस शिपाई सुशांत मरकड, हेमंत गिलबिले, मंगेश गोसावी, प्रदीप बहिरम, सचिन पिंगळ, संदीप लगड यांनी ही कामगिरी केली़


बस्ते, मोरे मास्टरमार्इंड

सोपान बस्ते, व राहुल मोरे हे घरफोडीतील मास्टरमार्इंड असून त्यांनी चोरीसाठी टोळीच तयार केली आहे़ गत काही वर्षांमधील ११ घरफोड्यांची त्यांनी कबुली दिली असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे़
- संजय दराडे, ग्रामीण पोलीस अधीक्षक,नाशिक

Web Title: nashik,house,breaker,gang,arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.