चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणा-या पतीस जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 05:15 PM2018-02-05T17:15:45+5:302018-02-05T17:18:22+5:30
नाशिक : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला क्रूरपणे मारहाण करून ठार मारणारा आरोपी पती गोविंद बाबूराव प्रधान (रा़ वांगणी शिवार, ता़ पेठे, जि़ नाशिक) यास प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी सोमवारी (दि़५) जन्मठेप व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली़
नाशिक : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला क्रूरपणे मारहाण करून ठार मारणारा आरोपी पती गोविंद बाबूराव प्रधान (रा़ वांगणी शिवार, ता़ पेठे, जि़ नाशिक) यास प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी सोमवारी (दि़५) जन्मठेप व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली़ ६ जून २०१६ रोजी वांगणी शिवारात ही घटना घडली होती़ पेठ पोलीस ठाण्यात दाखल या गुन्ह्यात सरकारी वकील शिरीष कडवे यांनी न्यायालयात बारा साक्षीदार तपासून आरोपीविरुद्ध सबळ पुरावे सादर केले़
पेठ तालुक्यातील वांगणी शिवारात आरोपी गोविंद प्रधान हा पत्नी वनिता व दहा वर्षीय मुलगी मनीषासह राहत होता़ पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेणाºया गोविंद प्रधान याने ६ जून २०१६ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास वांगणी शिवारातील झोपडीत पत्नी वनिता हीस तू सतत कोणाकडेही का बघते असे म्हणून लाकडी काठी व लाथाबुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण करण्यास सुरुवात केली़ यावेळी पत्नी वनिता ही मला मारू नका अशी, तर दहा वर्षांची मुलगी मनीषा हीदेखील वडिलांना आईला मारू नका विनवणी करीत होती़ मात्र मुलीला ढकलून देत आरोपी गोविंदने मारहाण सुरूच ठेवल्याने पत्नी वनिता हिचा जागीच मृत्यू झाला़
मुलगी मनीषा हिने ही घटना गावातील पार्वताबाई भडांगे व हिराबाई हिरकूड या महिलेस ही घटना सांगितली़ यानंतर नागरिक जमा झाले व त्यांनी आरोपी गोविंद प्रधान यास पोलिसांच्या ताब्यात दिले़ या प्रकरणी मयत वनिताचा भाऊ हिरामण बठाले याने पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती़ प्रधान न्यायाधीश शिंदे यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात अॅड़ कडवे यांनी बारा साक्षीदार तपासले़
लहान मुलीच्या साक्षीने वडिलांना शिक्षा
या खटल्यात सरकारी वकील कडवे यांनी तब्बल बारा साक्षीदार तपासले असले तरी सर्वांत महत्त्वाची साक्ष ठरली ती अल्पवयीन मुलगी मनीषा हिची़ घटनेची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या मनीषा हिने न्यायालयात वडिलांनी आईला किती क्रूर मारहाण केली याचे सविस्तर वर्णन केले होते़