इगतपुरी दरोड्याचा २४ तासात उलगडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 16:03 IST2017-10-29T15:59:25+5:302017-10-29T16:03:17+5:30

Nashik,ingatpuri,daroda,investigation | इगतपुरी दरोड्याचा २४ तासात उलगडा

इगतपुरी दरोड्याचा २४ तासात उलगडा

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखा : पारदेवी मंदिर खिंडीजवळील घटनामारहाणीनंतर लूट : सात संशयितांना अटक

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील एका हॉटेलचा मॅनेजर व महिला कामगार कारने घरी परतत असताना पारदेवी मंदिराच्या खिंडीजवळील रस्त्यावर दगड टाकून कार अडवून टाकण्यात आलेल्या दरोडा व मारहाणीचा नाशिक ग्रामिणच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या चोवीस तासात उलगडा केला आहे़ या प्रकरणी इगतपुरी तालुक्यातील गिरणारे येथील सात संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे २५ हजारांचा ऐवजही जप्त करण्यात आला आहे़

मुंबईतील अल्पवयीन मुली अश्लिल नृत्यप्रकरणी काही दिवसांपुर्वीच पोलिसांनी छापा टाकलेले इगतपुरी तालुक्यातील हॉटेल रेन फॉरेस्टचे मॅनेजर हुकूम धामे व दोन रिसेप्शनिस्ट महिला शुक्रवारी (दि़२७) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास दैनंदिन कामकाज आटोपून स्विफ्ट डिझायर कारने (एमएच १५, एफएफ ४७२४) पारदेवी मार्गे इगतपुरीला जात होते़ पारदेवी मंदिराच्या खिंडीजवळील चढावर रस्त्यावर दगड आडवे लावून आठ ते दहा संशयितांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक करून काचा फोडल्या़ तसेच मॅनेजर धामे व महिलांना मारहाणे त्यांच्याकडी पर्स, घड्याळ असा २ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला़ या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि़२८) दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला़

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर दरोडेखोर आसपासच्या गावातीलच असल्याची त्यांची खात्री पटली़ तसेच खबºयामार्फत मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी इगतपुरी तालुक्यातील गिरणारे येथील दीपक मच्छिंद्र लहाणे (२७), प्रकाश मच्छिंद्र लहाणे (२२) या दोघांना ताब्यात घेतले़ या दोघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी साथीदार सचिन काशिनाथ गिते (२२), मनोज अर्जुन डावखर (२२), विकास अर्जुन डावखर (२३), अमोल गोपाळ खारके (१९, सर्व राहणार गिरणारे, ता़इगतपुरी) व संतोष रामदास गिते (३२, रा़तळोशी, ता़इगतपुरी) यांच्यासोबत मिळून दरोडा टाकल्याची कबुली दिली़ पोलिसांनी या संशयितांकडून लूटून नेलेली पर्स व २४ हजार ३६० रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे़

ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीन दुनगहू, आशिष अडसूळ, सहायक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ गुरूळे, रामभाऊ मुंढे, पोलीस हवालदार शिवाजी जुंदरे, बंडू ठाकरे, पोलीस शिपाई संदीप हांडगे, सचिन पिंगळ, सुशांत मरकड, हेमंत गिलबिले, संदीप लगड, प्रदीप बहिरम, चालक रानडे यांनी ही कामगिरी केली़

Web Title: Nashik,ingatpuri,daroda,investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.