काश्मिरमधील चकमकीत नाशिकचे जवान मिलिंद खैरनार शहीद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 05:14 PM2017-10-11T17:14:54+5:302017-10-11T17:38:24+5:30

Nashik,jawan,Milind,Khairnar,Shahid | काश्मिरमधील चकमकीत नाशिकचे जवान मिलिंद खैरनार शहीद

काश्मिरमधील चकमकीत नाशिकचे जवान मिलिंद खैरनार शहीद

googlenewsNext

नाशिक : काश्मिरच्या बांदीपोरामध्ये येथील हाजीन भागात बुधवारी(दि़११) पहाटे सुरक्षा पथके व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या जोरदार चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत़ त्यात एक शहिद जवान महाराष्ट्राचे सुपुत्र असून त्यांचे नाव मिलिंद (रिंकू) किशोर खैरनार (३४, मूळ राहणार रनाळे, ता. शहादा जि. नंदुरबार) आहेत़ सद्यस्थितीत खैरनार यांचे कुटुंबिय नाशिक दिंडोरी रोडवरील स्रेहनगरमधील श्री गणेश प्लाझा येथे राहतात़

बांदीकोरा मधील हाजीन भागात बधुवारी पहाटे सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये संघर्ष उडाला. यावेळी भारतीय जवानांनी दहशतवाद्यांना चोख प्रतिउत्तर दिले. लष्कराच्या गोळीबारानंतर पळालेले दहशतवादी एका घरात लपून बसले. दहशतवाद्यांना शोधण्यासाठी भारतीय जवानांनी सर्च आॅपरेशनवेळी घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला जवानांनी चोख प्रतिउत्तर दिले. त्यात दोन्ही दहशतवादी ठार झाले. परंतु या संघर्षात भारतीय लष्कराचे दोन जवान शहिद झाले. त्यात एअर फोर्स कमांडो मिलिंद खैरनार  आहेत़

शहिद जवान मिलिंद(रिंकू) किशोर खैरनार यांचे वडील किशोर सदाशिव खैरनार ह्यांचे मुळ गाव रनाळे, ता. शहादा जि. नंदुरबार हे आहे. विज महामंडळातिल नोकरी मुळे ते साक्री जि. धुळे येथे स्थायिक झाले होते. त्यानंतर ते नाशिकला स्रेहनगरमध्ये स्थायिक झाले आहेत. शहिद जवान मिलिंद (३४) यांच्या पत्निचे नाव हर्षदा असून त्यांना वेदिका (५वर्षे) मोठी मुलगी व कृष्णा( २ वर्षे)मुलगा असे दोन आपत्ये आहेत. जवान मिलिंद तिन वर्षा नंतर सैन्यातून निवृत्त होणार होता. मिलिंदचा मोठा भाऊ मनोज किशोर खैरनार हा ही मुंबई पोलिसात जवान आहे.

शहीद मिलिंद खैरनार यांचे बालपण हे साक्री आणि धुळे येथे गेले. जवान मिलिंद खैरनार हे धुळ्यात आपल्या मामांकडे शिक्षणासाठी होते. येथील एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते भारतीय लष्करात भरती झाले होते. त्यांचे कुटुंबीय म्हसरूळ दिंडोरी रोडवरील स्रेहमधील श्री गणेश प्लाझा येथे राहत आहेत़ दरम्यान मिलिंद खैरनार यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांच्या नातेवाईकांनी नाशिकच्या स्नेहनगरमध्ये गर्दी केली.

Web Title: Nashik,jawan,Milind,Khairnar,Shahid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.