नाशकात ११ डिसेंबरपासून नाशिक कबड्डी लीग सिझन-२
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 11:31 PM2017-12-04T23:31:08+5:302017-12-04T23:47:31+5:30
नाशिक : नाशिक महानगरपालिका आणि क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ११ ते १७ डिसेंबर दरम्यान ‘नाशिक कबड्डी प्रीमिअर लीग सिझन-२’ या राज्यस्तरीय प्रकाशझोतातील कबड्डी स्पर्धेचे अयोजन करण्यात आले असल्याची माहिती व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक आणि अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

केव्हीएन नाईक नाशिक कबड्डी प्रीमिअर लीग सिझन-१ च्या विभागीय स्तरावरील आयोजनानंतर यंदाच्या वर्षी या स्पर्धेचे आयोजन राज्यस्तरावर करण्यात आले आहे. सदर स्पर्धेत दादाजी आव्हाड, आदीनाथ गवळी, मोबीन शेख, प्रशांत जाधव, विवेक नाडार यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा या स्पर्धेत सहभाग असणार आहे.
सदर स्पर्धेत यजमान नाशिकसह धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, जालना, मुंबई शहर, उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, पुणे या जिल्ह्यांतील ७८ खेळाडूंची निवड करण्यात आली असून, त्यांची विभागणी सहा संघांत करण्यात आली आहे. सर्वज्ञ रायडर्स, एबीसी रॉयल फायटर्स, नाशिक लायन्स, सिन्नर सायलेंट किलर, कान्हैया चॅलेंजर, दिंडोरी डिफेंडर या संघांचा समावेश आहे. यावेळी सिन्नर सायलेंट संघाचे संघ मालक विश्वनाथ शेळके, एबीसी संघाचे अजित बने, राजेंद्र कातोरे, कन्हैया चॅलेजर संघाचे भूषण घुगे, सुहास आव्हाड, दिंडोरी डिफेंडर्सचे राजेश दरगोडे, सर्वज्ञ रायडर्सचे विशाल संगमनेरे, नाशिक लायन्सचे किरण फड यांचा सत्कार करण्यात आला.
११ ते १७ डिसेंबर या कालावधीत सायंकाळी ६ ते रात्री १० या दरम्यान मॅटवरील मैदानावर प्रकाशझोतात खेळविण्यात येणार आहे. पंधरा साखळी सामने आणि ४ बाद फेरीचे असे १९ सामने होणार आहेत. पहिले पाच दिवस रोज तीन सामने आणि सहाव्या दिवशी उपांत्य फेरीचे व अंतिम दिवशी तृतीय, चतुर्थ व अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे.