नाशिकमधील मेकॅनिकल इंजिनिअरला पावणेतीन कोटींना गंडा घालणाऱ्या नायजेरियनला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 11:07 PM2018-06-05T23:07:42+5:302018-06-05T23:07:42+5:30

नाशिक : आॅस्ट्रेलियातील इंटरनॅशनल कंपनीची डुप्लीकेट वेबसाइट तयार करून व त्याद्वारे मोठ्या वेतनाचे आमिष दाखवून नाशिकमधील मेकॅनिकल इंजिनिअरला नायजेरियन टोळीने पावणेतीन कोटी रुपयांना गंडा घातला.या फसवणुकीनंतर विदेशात पळून जाण्याच्या तयारीत असलेला आंतरराष्ट्रीय नायजेरियन टोळीतील संशयित जेरेमीह ईमेका ओकोण्कोव (रा. इलेप्को बस स्टॉप, अरारोमी, बडाग्रे एक्स्प्रेस वे, लागोस, नायजेरिया) यास नाशिक शहर सायबर पोलिसांनी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली़

nashik,machenical,engineer,service,fraud,one,arrested | नाशिकमधील मेकॅनिकल इंजिनिअरला पावणेतीन कोटींना गंडा घालणाऱ्या नायजेरियनला अटक

नाशिकमधील मेकॅनिकल इंजिनिअरला पावणेतीन कोटींना गंडा घालणाऱ्या नायजेरियनला अटक

Next
ठळक मुद्देसायबर पोलिसांची कामगिरीविदेशात पळून जाण्याचा प्रयत्नदिल्ली विमानतळावरून अटक

नाशिक : आॅस्ट्रेलियातील इंटरनॅशनल कंपनीची डुप्लीकेट वेबसाइट तयार करून व त्याद्वारे मोठ्या वेतनाचे आमिष दाखवून नाशिकमधील मेकॅनिकल इंजिनिअरला नायजेरियन टोळीने पावणेतीन कोटी रुपयांना गंडा घातला.या फसवणुकीनंतर विदेशात पळून जाण्याच्या तयारीत असलेला आंतरराष्ट्रीय नायजेरियन टोळीतील संशयित जेरेमीह ईमेका ओकोण्कोव (रा. इलेप्को बस स्टॉप, अरारोमी, बडाग्रे एक्स्प्रेस वे, लागोस, नायजेरिया) यास नाशिक शहर सायबर पोलिसांनी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली़ दरम्यान, संशयितास न्यायालयात हजर केले असता ११ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मेकॅनिकल इंजिनिअर असलेले दीपक दिगंबर पाठक (५३, रा. पाटील क्लासिक, गोविंदनगर, नाशिक) हे गुजरातमधील मल्टिनॅशनल कंपनीमध्ये उच्चपदावर नोकरीला आहेत़ गतवर्षी १६ मे ते ५ जुलै २०१७ या कालावधीत पाठक यांना आॅस्ट्रेलियातील इंटरनॅशनल कंपनीमध्ये मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून बनावट ईमेल आयडीवरून अपॉर्इंटमेंट लेटर, पेमेंट रिसीट व अ‍ॅग्रिमेंट लेटर बनवून पाठविले़ यानंतर वेगवेगळी कारणे सांगून वेळोवेळी वेगवेगळ्या बँकेतील खात्यांवर पैसे टाका असे सांगून तब्बल २ कोटी ७८ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केली़ या फसवणुकीबाबत त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात २६ आॅक्टोबर २०१७ रोजी फिर्याद दिल्यानंतर फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता़

पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी या गुन्ह्याबाबत तपास करण्याचे आदेश सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवराज बोरसे यांना दिले होते़ त्यानुसार गत आठ महिन्यांपासून सायबर पोलीस या गुन्ह्याचा बारकाईने तपास करीत होते़ याच कालावधीत सायबर पोलिसांनी नायजेरियन संशयिताच्या खात्यात वर्ग होणारी ३५ लाख रुपयांची रक्कमही वाचविली होती़ पाठक यांच्या फसवणुकीतून मिळविलेले पैसे संशयिताने ओरिसा, बिहार, उत्तर प्रदेश, तसेच दिल्लीतील नोएडा येथून वर्ग केल्याची तांत्रिक माहिती सायबर पोलिसांना मिळाली़ त्यानुसार सायबर पोलिसांनी जोरदार प्रयत्न करून संशयित ओकोण्कोव हा दिल्लीत असल्याची माहिती मिळविली़

नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणा-या आंतराष्ट्रीय टोळीतील संशयित ओकोण्कोव हा दिल्लीत असल्याची तसेच परदेशात पळून जात असल्याची खात्रीशीर माहिती तांत्रिक विश्लेषणातून मिळविण्यात आली़ यानंतर सायबर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक कल्याणी वर्मा, पोलीस शिपाई नितीन निकम, पराग गायकवाड यांचे पथक दिल्लीला रवाना झाले़ त्यांनी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विदेशात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या ओकोण्कोवच्या मुसक्या आवळून त्यास ताब्यात घेतले़ दरम्यान, त्यास तपासासाठी बंगळुरू येथे नेण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे़

Web Title: nashik,machenical,engineer,service,fraud,one,arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.