पोलीस उपनिरीक्षकाला बलात्कार प्रकरणी सात वर्षे सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 06:08 PM2018-06-26T18:08:54+5:302018-06-26T18:16:23+5:30

नाशिक : विवाहाचे अमिष दाखवून चार वर्षे प्रेमसंबंध ठेवून विविध ठिकाणी नेऊन शारीरीक अत्याचार करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकास जिल्हा व सत्र न्यायाधीश सुचित्रा घोडके यांनी मंगळवारी (दि़२६) बलात्काराच्या गुन्ह्यात सात वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ पंकज सुरेश काटे (रा़ पंडीतनगर, मोरवाडी, सिडको, नाशिक)असे शिक्षा झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात तो कर्तव्यावर आहे़ जिल्हा न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील रविंद्र निकम यांनी पाच साक्षीदार तपासून आरोप सिद्ध केले़

nashik,Police,sub-inspector,seven,years,prisionment,rape,case | पोलीस उपनिरीक्षकाला बलात्कार प्रकरणी सात वर्षे सक्तमजुरी

पोलीस उपनिरीक्षकाला बलात्कार प्रकरणी सात वर्षे सक्तमजुरी

googlenewsNext
ठळक मुद्दे जिल्हा व सत्र न्यायालय : २०१२ मध्ये गुन्हा दाखल पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर

नाशिक : विवाहाचे अमिष दाखवून चार वर्षे प्रेमसंबंध ठेवून विविध ठिकाणी नेऊन शारीरीक अत्याचार करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकास जिल्हा व सत्र न्यायाधीश सुचित्रा घोडके यांनी मंगळवारी (दि़२६) बलात्काराच्या गुन्ह्यात सात वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ पंकज सुरेश काटे (रा़ पंडीतनगर, मोरवाडी, सिडको, नाशिक)असे शिक्षा झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात तो कर्तव्यावर आहे़ जिल्हा न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील रविंद्र निकम यांनी पाच साक्षीदार तपासून आरोप सिद्ध केले़

नाशिकमधील महाराष्ट्र पोलीस अकादमीत प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाचे प्रशिक्षण सुरू असताना आजारी पडल्याने पंकज काटे हा शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होेते़ या ठिकाणी काम करीत असलेल्या नर्ससोबत काटे याचे प्रेमसंबंध निर्माण झाले़ या युवतीस विवाहाचे अमिष दाखवून २००७ ते २०११ या कालावधीत नाशिक, पुणे अशा विविध ठिकाणी नेऊन उपनिरीक्षक काटे याने शारीरिक अत्याचार केले़ मात्र, पोलीस उपनिरीक्षक झाल्यानंतर आरोपी काटे याने विवाहाचे आश्वासन पाळले नाही तसेच बळजबरीने शारीरीक अत्याचार (बलात्कार) केल्याची फिर्याद पिडीत युवतीने अंबड पोलीस ठाण्यात २०१२ मध्ये दिली होती़

जिल्हा व सत्र न्यायाधीश सूचित्रा घोडके यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त हेमराजसिंह राजपूत (अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर) यांनी केला होता़ तर सरकारी वकील रविंद्र निकम यांनी या खटल्यात मूळ फिर्यादी, तिची नर्स मैत्रिण, हॉटेलचा मॅनेजर, डॉक्टर व राजपूत अशा पाच जणांची साक्ष घेतली़ यामध्ये पिडीतेची मैत्रिण ही फितूर झाली होती़ मात्र, सरकारी वकीलांनी साक्षीदारांचे जबाब तसेच परीस्थितीजन्य पुरावे न्यायालयासमोर मांडून काटे विरोधात सबळ पुरावे सादर केले़

न्यायाधीश घोडके यांनी आरोपी पंकज काटे यास बलात्काराच्या गुन्ह्यात सात वर्षे सश्रम कारावास व २० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्षे साधा कारावास, अ‍ॅटॉसिटीच्या गुन्ह्यात पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास तसेच नागरी हक्क संरक्षण अधिनियम कलम (७)अन्वये सहा महिने कारावास व पाचशे रुपये दंड अशी शिक्षा सुनावली़ न्यायालयाने ठोठावलेल्या २५ हजार पाचशे रुपये दंडापैकी २० हजार रुपये पिडीतेला देण्याचे आदेशही देण्यात आले आहे़

पुरावे न्यायालयासमोर सादर

पिडीत युवती सज्ञान असून तिच्या संमतीनेच दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले त्यास बलात्कार म्हणता येणार नाही असा बचाव केला़ पिडीत युवती सज्ञान असली तरी विवाहाच्या आश्वासनामुळेच तिने शारीरीक संबंधास संमती दिल्याचा आम्ही युक्तिवाद केला़ तसेच या खटल्यात तिची नर्स असलेली मैत्रिणही फितूर झाली होती़ मात्र, हॉटेल मॅनेजर, डॉक्टर व तपास अधिकारी यांचा जबाब व परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयासमोर सादर केले व त्या आधारे आरोपी दोषी ठरविण्यात आले़
- अ‍ॅड़ रविंद्र निकम, सरकारी वकील, जिल्हा न्यायालय़

Web Title: nashik,Police,sub-inspector,seven,years,prisionment,rape,case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.