नाशिकरोडला चार युवकांकडून दोन गावठी कट्टे, तलवारी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 11:01 PM2018-04-28T23:01:17+5:302018-04-28T23:01:17+5:30

नाशिकरोड : येथील वास्को चौकात पोलिसांनी चौघा युवकांकडून दोन गावठी कट्टे व दोन तलवारी जप्त केल्या़ या चौघा संशयितांमध्ये शिवसेनेच्या नेत्याच्या मुलाचा समावेश असल्याची माहिती नाशिकरोड पोलिसांनी दिली आहे़

NashikRoad,four,sespeted,two,pistal,seized | नाशिकरोडला चार युवकांकडून दोन गावठी कट्टे, तलवारी जप्त

नाशिकरोडला चार युवकांकडून दोन गावठी कट्टे, तलवारी जप्त

Next
ठळक मुद्देशिवसेनेच्या नेत्याच्या मुलाचा समावेश नाशिकरोडच्या वास्को चौकात सापळा

नाशिकरोड : येथील वास्को चौकात पोलिसांनी चौघा युवकांकडून दोन गावठी कट्टे व दोन तलवारी जप्त केल्या़ या चौघा संशयितांमध्ये शिवसेनेच्या नेत्याच्या मुलाचा समावेश असल्याची माहिती नाशिकरोड पोलिसांनी दिली आहे़

नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांना शनिवारी (दि़२८) सायंकाळी वास्को चौकात काही युवक गावठी कट्टे व तलवारी विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार गुन्हे शोध पथकाने वास्को चौकात सायंकाळपासून सापळा रचला होता़ यावेळी सुनील अविनाश सोनवणे (वय २३, रा़ जगताप मळा), आदेश चंद्रकांत लवटे (२३, रा़मधुशाळा हॉटेलशेजारी), संग्राम बिंदूमाधव फडके (३९, रा़ शिवआराधना अपार्टमेंट, गंधर्वनगरी) हे तिघे संशयित दुचाकीवर(एमएम १५, ईझेड १०२८) आले़ त्या ठिकाणी शंकर गोवर्धन वाडेकर (३२, रा़ नांदूरगाव शिवार) हा तिथे उभा होता़ त्यांच्या संशयास्पद हालचाली पाहून सापळा रचलेल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे दोन गावठी कट्टे व दोन तलवारी आढळून आल्या़

या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़ चार दिवसांपूर्वीच देवळाली गाव सत्कार पॉर्इंट येथे गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती शाखेने संशयित संग्राम फडके याच्याकडून दोन गावठी कट्टे व अकरा जिवंत काडतुसे जप्त केली होती़ संशयित आदेश लवटे हा शिवसेना नेते राजू लवटे यांचा मुलगा आहे़

Web Title: NashikRoad,four,sespeted,two,pistal,seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.