सोनसाखळी खेचणा-या इराणी टोळीस दिल्लीहून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 05:42 PM2018-02-14T17:42:06+5:302018-02-14T17:45:51+5:30
नाशिक : पुढे, खून झाला आहे, आम्ही पोलीस आहोत, अंगावरील दागिने काढून ठेवा अशी बतावणी करून वृद्ध नागरिक तसेच महिलांच्या अंगावरील सोनसाखळ्या खेचणा-या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरच्या इराणी टोळीतील पाच संशयितांना नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने दिल्लीतून अटक केली आहे़ या संशयितांनी शहरातील सहा गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्याकडून ५ लाख १७ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आहे़ त्यामध्ये स्विफ्ट डिझायर कारसह १२७ ग्रॅम सोन्याचे दागिण्यांचा समावेश आहे़
नाशिक : पुढे, खून झाला आहे, आम्ही पोलीस आहोत, अंगावरील दागिने काढून ठेवा अशी बतावणी करून वृद्ध नागरिक तसेच महिलांच्या अंगावरील सोनसाखळ्या खेचणा-या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरच्या इराणी टोळीतील पाच संशयितांना नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने दिल्लीतून अटक केली आहे़ या संशयितांनी शहरातील सहा गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्याकडून ५ लाख १७ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आहे़ त्यामध्ये स्विफ्ट डिझायर कारसह १२७ ग्रॅम सोन्याचे दागिण्यांचा समावेश आहे़
शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने दिल्लीहून अटक केलेल्या इराणी टोळीतील संशयितांमध्ये सलीम नुरअली इराणी (४०), कंबर शाहजान जाफरी (३२), रियाज फैयाज इराणी (३८), राज पोलीद इराणी (३४, चौघे रा. श्रीरामपूर, जि. नगर) आणि महंमद अजिज जाफरी (३४, रा. काळभोर, जि. पुणे) यांचा समावेश आहे़ गुन्हे शाखने यापुर्वीच शहरात घरफोड्या करणा-या दिल्लीतील तिन सराईतांना अटक केलेली आहेग़त आठवड्यात गुन्हे शाखेने शहरात घरफोडी करणा-या दिल्लीतील आंतरराज्यीत टोळीस अटक केल्यानंतर त्यांच्याकडून चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी पोलीस निरीक्षक आनंद वाघ, सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, पोलीस हवालदार रविंद्र बागूल, पोलीस शिपाई विशाल देवरे, चालक दीपक जठार हे जयपूरमार्गे दिल्लीला जात होते़
या प्रवासादरम्यान चेनस्रॅचिंग व तोतया पोलिसांची माहिती घेण्याचे काम सूरू होते़ त्यांना श्रीरामपूरची इराणी टोळी चोरी करण्यासाठी दिल्लीला जात असलयाची माहिती मिळाली़ त्यानुसार वाघ यांनी वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावून इराणी टोळीतील पाच संशयितांना स्विफ्ट कारसह ताब्यात घेतले़ गुन्हे शाखेतील दुसरे पथक सहायक पोलीस निरीक्षक खैरनार,पोलीस हवालदार दिघोळे, पोलीस शिपाई स्वप्निल जुंदे्र, राहुल पालखेडे, रावजी मगर, मोहन देशमुख यांचे पथक रवाना झाले व त्यांनी या पाचही संशयितांना नाशिकला आणले़
पोलीस आयुक्त डॉ़रविंद्र सिंगल,उपआयुक्त विजयकुमार मगर, सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते, यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली़ या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे, सहायक पोलीस निरीक्षक दीपक गिरमे, मोहिते, सहायक फौजदार पोपट कारवाळ, जाकिर शेख, पळशीकर, पोलीस हवालदार मुळक, पांडव, दोंदे, पोलीस नाईक मोंढे, कोरडे, तांबोळी, पोलीस शिपाई सूर्यवंशी, महाले, काठे, गणेश वडजे, गणेश रुमाले, सचिन आजबे, विलास कुटे, नीलेश भोईर, प्रतिभा पोरखकर यांचाही सहभाग होता़
सव्वापाच लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी इराणी टोळीतील संशयितांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी म्हसरुळ पोलीस ठाणे हद्दीत पोलीस बतावणीचे दोन गुन्हे केल्याची कबुली दिली. तसेच इंदिरानगर येथे दोन, आडगाव व गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत प्रत्येकी एक सोनसाखळी खेचल्याची कबुली दिली़ या इराणी टोळीतील संशयितांकडून १२७ ग्रॅम सोन्याचे दागिने, स्विफ्ट डिझायर कार असा पाच लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.