शर्टवरील टेलर मार्कवरून खुनाचा उलगडा़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 10:15 PM2017-08-26T22:15:32+5:302017-08-26T22:19:47+5:30

nashik,sinnar,osmanabad,man,murder,detection | शर्टवरील टेलर मार्कवरून खुनाचा उलगडा़

शर्टवरील टेलर मार्कवरून खुनाचा उलगडा़

Next
ठळक मुद्देग्रामीण पोलिसांची कामगिरीउस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील इसमाचा खूनपत्नी मंदाकिनी तिचा प्रियकर भागचंद भागरेचा अनैतिक संबंधातून खून केल्याची कबुली

नाशिक : सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील दातली शिवारात सहा महिन्यांपूर्वी डोक्यात दगड घातलेल्या अवस्थेत आढळलेल्या अनोळखी मृतदेहाच्या शर्टवर असलेल्या टेलरच्या मार्कवरून खुनाचा उलगडा करण्यात यश आल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली़ खून करण्यात आलेला इसम हा उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील मंगरूळ येथील रहिवासी बालाजी पंढरी बनसोडे असून, अनैतिक संबंधातून त्याची पत्नी मंदाकिनी बनसोडे तिचा प्रियकर भागचंद रामविलास भागरेचा याने केल्याचे समोर आले असून, या दोघांनाही अटक करण्यात आली आहे़
दातली शिवारातील गट नंबर ५६९ मधील कोरड्या शेततळ्यामध्ये एका अनोळखी इसमाचा मृतदेह २४ फेब्रुवारी २०१७ रोजी आढळून आला़ या इसमाच्या डोक्यावर, कपाळावर तसेच गळ्यावर गंभीर दुखापत असल्याने प्रथम अकस्मात मृत्यू व शवविच्छेदन अहवालानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ जिल्ह्यातील अनोळखी मृतदेह व खुनाच्या घटनेचा तपास करण्यासाठी अधीक्षक दराडे यांनी अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एक पोलीस अधिकारी व चार पोलीस कर्मचाºयांचे विशेष पथक तयार केले असून, त्यांच्याकडे या खुनाच्या तपासाची जबाबदारी सोपविण्यात आली होती़
ग्रामीण पोलिसांच्या विशेष तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक ए. ए. गडाख, सहायक पोलीस उपनिरीक्षक बाजारे, पोलीस हवालदार इंगळे, पोलीस नाईक केदारे, पोलीस शिपाई गावले यांनी मृतदेहाच्या अंगातील शर्टवर असलेला ‘दीपक टेलर्स, कळंब’ हा मार्क व धाग्यातील दोरा यावरून तपास सुरू केला़ या टेलरकडे जाऊन त्याच्याकडील रजिस्टरची तपासणी केली असता बालाजी वानखेडे नावाचे दोन इसम असल्याचे आढळून आले़
पोलिसांनी नामसाधर्म्य असलेल्या वानखेडे नावाच्या दोघांचा शोध घेतल्यानंतर मंगरूळ गावात गोपनीयरीत्या दोन-तीन दिवस राहून माहिती घेतली़ त्यांना बालाजी वानखेडे हा गत सहा महिन्यांपासून बेपत्ता असून, त्याच्या पत्नीने हरविल्याची साधी तक्रारही दाखल केली नसल्याचे तसेच त्याची पत्नी मंदाकिनी व गावातील भागचंद भागरेचा यांचे अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली़ पोलिसांनी या दोघांना संशयावरून ताब्यात घेतले़ त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर पती बालाजी वानखेडे हा संशयित भागरेचा यास ब्लॅकमेल करीत असे तसेच स्वत:च्या मुलीवरही त्याने शारीरिक अत्याचार केले़
गावात झालेल्या भांडणामध्ये बालाजीला मारहाण करणाºयांनी जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याने तो दीड महिन्यापासून गावातून निघून नाशिकला आला होता़ भागरेचा याने आपल्याला मदत केली नाही म्हणून बालाजी त्यास नेहमी शिवीगाळ करीत असे़ त्यातच बालाजी याने भागरेचा यास २२ फेब्रुवारी २०१७ रोजी नाशिक येथे घेण्यास बोलविले असता तो इंडिका घेऊन आला़ बालाजी यास कारमधून घेऊन जात असताना सिन्नरच्या पुढे गेल्यानंतर भागरेचा याने गळा दाबण्याचा प्रयत्न केला असता बालाजीने त्याच्या हाताला चावा घेतला़
यामुळे संतप्त झालेल्या भागरेचा याने बालाजी वानखेडेच्या डोक्यात दगड टाकून जिवे ठार मारले व शेतातील बांधावरून त्यास शेततळ्यात फेकून दिले़ संशयित भागरेचा व मंदाकिनी यांनी अनैतिक संबंधातून खून केल्याची कबुली दिली आहे़
दरम्यान, या खुनाचा यशस्वी तपास करणाºया पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे पोलीस अधीक्षक दराडे यांनी अभिनंदन करून दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे़

Web Title: nashik,sinnar,osmanabad,man,murder,detection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.