नाशिकमध्ये झोक्याच्या दोरीचा फास बसून दहा वर्षीय चिमुरडीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 21:47 IST2018-03-11T21:22:26+5:302018-03-11T21:47:16+5:30
नाशिक : घरात मुलींसोबत झोका खेळत असताना अचानक दोरी तुटून त्याचा फास बसल्याने दहा वर्षीय मुलीचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि़११) दुपारी चुंचाळे शिवारात घडली़ तितीक्षा किरण राऊळ (रा. रो हाऊस नंबर ५७३, जाधव टाऊनशीप, चुंचाळे शिवार, नाशिक) असे दुर्दैवी मुलीचे नाव आहे़ या घटनेची अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़

नाशिकमध्ये झोक्याच्या दोरीचा फास बसून दहा वर्षीय चिमुरडीचा मृत्यू
नाशिक : घरात मुलींसोबत झोका खेळत असताना अचानक दोरी तुटून त्याचा फास बसल्याने दहा वर्षीय मुलीचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि़११) दुपारी चुंचाळे शिवारात घडली़ तितीक्षा किरण राऊळ (रा. रो हाऊस नंबर ५७३, जाधव टाऊनशीप, चुंचाळे शिवार, नाशिक) असे दुर्दैवी मुलीचे नाव आहे़ या घटनेची अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घरातील बेडरूममध्ये बांधलेल्या झोक्यावर तितीक्षासह आणखी दोन मुली झोका खेळत होत्या़ दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास झोक्याचा एक दोर तुटला व त्याचा फास तितीक्षाच्या गळ्याभोवती बसला़ ही बाब लक्षात येताच तिचे वडील किरण राऊळ यांनी तिला उपचारासाठी प्रथम घराजवळील खासगी रुग्णालय व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉग़ायधनी यांनी तपासून मयत घोषीत केले़
पोलीस आयुक्तालयातील प्रशासन विभागात लिपीक म्हणून कार्यरत असलेले किरण राऊळ यांची तितिक्षा ही मुलगी आहे़ या घटनेमुळे जाधव टाऊनशिप परिसरात हळहळ व्यक्त केली आहे़ दरम्यान, दोन आठवड्यांपुर्वीच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथील आदिवासी पाड्यातील बारा वर्षीय मुलीचा झोका खेळत असताना गळफास बसून मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती़
पालकांनी त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे
सिडको परिसरात यापुर्वी एका लहान मुलाच्या घशात खेळण्यातील रबरचा फुगा अडकल्याने तर नाशिकरोड परिसरात दहा रुपयांचा कॉईन घशात अडकल्याने मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे़ लहान मुले घरात खेळत असताना पालकांनी त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे़
- मधुकर कड, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, अंबड़