ठाण्यातील व्यवसायिकाची ४८ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 06:59 PM2017-12-23T18:59:10+5:302017-12-23T19:05:50+5:30

नाशिक : पर्यटनाच्या व्यवसायासाठी भाडेतत्वावर घेतलेल्या बसेसचे भाडे थकवून बस परत न करता ठाणे येथील व्यवसायिकाची नाशिकमधील फरहान जिलानी कोकणी, आवेश जिलानी कोकणी या दोघा संशयितांनी सुमारे ४८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे़ विशेष म्हणजे फसवणूक करणाºया संशयितांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे़

nashik,Thane,businessman,48lakh,fraud | ठाण्यातील व्यवसायिकाची ४८ लाखांची फसवणूक

ठाण्यातील व्यवसायिकाची ४८ लाखांची फसवणूक

Next
ठळक मुद्दे पर्यटनाच्या व्यवसायासाठी भाडेतत्वावर बस४८ लाख रुपयांची फसवणूक ; जीवे ठार मारण्याची धमकी

नाशिक : पर्यटनाच्या व्यवसायासाठी भाडेतत्वावर घेतलेल्या बसेसचे भाडे थकवून बस परत न करता ठाणे येथील व्यवसायिकाची नाशिकमधील फरहान जिलानी कोकणी, आवेश जिलानी कोकणी या दोघा संशयितांनी सुमारे ४८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे़ विशेष म्हणजे फसवणूक करणाºया संशयितांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे़
ठाणे येथील दिनेश ज्ञानेश्वर जाधव (२३, रा. शॉप नंबर १, जाधव चाळ, एकता नगर, शिळ फाटा, दिवारोड, ता़जि़ठाणे) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित फरहाण कोकणी व आवेश कोकणी यांना ट्रॅव्हलच्या व्यवसायासाठी ३५ लाख रुपये किमतीच्या पाच बस करारनामा करून भाडेतत्वावर घेतल्या होत्या़ मेघदूत शॉपिग सेंटरमध्ये अ‍ॅड़ उदय शिंदे यांच्या चेंबरमध्ये १७ जानेवारी ते १ आॅगस्ट २०१७ या कालावधीत हा भाडे करारनामा करण्यात आला होता़
या कराराची मुदत संपल्यानतर जाधव यांनी संशयितांकडे भाडेतत्वावर घेतलेल्या बसेस व भाड्यापोटी शिल्लक असलेले १३ लाख २५ हजार रुपयांची मागणी केली़ मात्र, संशयितांनी जाधव यांना बसेस व बसभाडे देण्यास नकार देऊन ४८ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केली़ तसेच पैशांची मागणी केली असता शिवीगाळ तसेच दमदाटी करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे़ या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा युनिट एक करीत आहे़

Web Title: nashik,Thane,businessman,48lakh,fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.