पोलीस कर्मचाऱ्यांसही टोर्इंग झोलचा फटका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 10:28 PM2018-04-29T22:28:14+5:302018-04-29T22:39:15+5:30
नाशिक : शहरात सुरू केलेल्या टोर्इंगमुळे मूळ हेतुलाच बगल मिळाल्याचे दिसून सामान्य नागरीकांप्रमाणेच सिन्नर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार नितीन मंडलिक यांनाही बसला आहे. नो पार्कींगमध्ये मोटार नसताना आपली मोटार उचलण्यात आली. तसेच जागीच दंड भरण्याची तयारी दर्शविल्यानंतर देखील मोटार ट्रॅफीक आॅफीसमध्ये लावून साडे सहाशे रूपयांची वसुली करण्यात आल्याची तक्रारी खुद्द या कर्मचा-यानेच पोलीस आयुक्तरवींद्रकुमार सिंगल यांना पत्राद्वारे कळविला आहे़
नाशिक : शहरात सुरू केलेल्या टोर्इंगमुळे मूळ हेतुलाच बगल मिळाल्याचे दिसून सामान्य नागरीकांप्रमाणेच सिन्नर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार नितीन मंडलिक यांनाही बसला आहे. नो पार्कींगमध्ये मोटार नसताना आपली मोटार उचलण्यात आली. तसेच जागीच दंड भरण्याची तयारी दर्शविल्यानंतर देखील मोटार ट्रॅफीक आॅफीसमध्ये लावून साडे सहाशे रूपयांची वसुली करण्यात आल्याची तक्रार खुद्द या कर्मचा-यानेच पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांना पत्राद्वारे कळविली आहे़
१६ मार्च २०१८ रोजी चांदवड टोल नाक्यावरील शस्त्रसाठा खटल्यातील तारखेसाठी मंडलिक जिल्हा न्यायालयात आपल्या स्विफ्ट कारने (एमएच ४१, सी ८८२०) आले होते़ राजीव गांधी भवनसमोरील स्टेट बँक आॅफ इंडियात कामानिमित्त आले असता शॉपिंग कॉम्प्लेक्सजवळ त्यांनी कार उभी केली व बँकेत गेले़ अवघ्या पाच मिनिटांत बाहेर आल्यानंतर त्यांना वाहतूक शाखेतील पोलीस हवालदार व टोर्इंगवरील तीन-चार कर्मचारी टोर्इंग करीत असल्याचे दिसले़ मंडलिक हे हवालदार यांच्याकडे गेले, मात्र त्यांनी आपली ओळख न देता सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे नो पार्किंगमध्ये वाहन नसल्याचे सांगितले़ मात्र, हवालदार कायद्याचा धाक दाखवित साडेतीनशे रुपयांची मागणी केली़ यावर जागेवरच कारचा नो पार्किंगचा दंड घ्या, टोर्इंग करू नका या नियमाबाबत सांगून पोलीस असल्याचे सांगितले़
मंडलिक हे पोलीस असल्याचे कळाल्यानंतर हवालदार यांनी भाषा बदलली, मात्र कॅमे-यात कार आल्याने ती टोर्इंग करावीच लागेल, असे सांगून सहाशेसाठ रुपयांची मागणी करून टोर्इंग केली़, असे मंडलीक यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हंटले आहे. नियमानुसार टोर्इंगपूर्वी व जागेवरच असल्याने केवळ नो पार्किंगचा दंड घेणे अपेक्षित होते़ मात्र, केवळ देवरे साहेबांशी बोलले तरच पार्किंगचा दंड घेऊन गाडी सोेडेल, असे हवालदार यांनी सांगितले़ अखेर टोर्इंग केल्यामुळे नो पार्किंग व टोर्इंग असे सहाशे साठ रुपये भुर्दंड बसल्याचे मंडलीक यांनी सांगितले.
आयुक्तांच्या प्रतिमेस छेद
नो पार्किंगमध्ये कार नसताना तसेच नो पार्किंगचा दंड जागेवर भरण्यास तयार असतानाही कार टोर्इंग केली़ विशेष म्हणजे ग्रामीण पोलीसचे उपविभागीय अधिकारी राजमाने साहेबांनी विनंती केल्यानंतरही त्यांना कायदा शिकविण्यात आला़ पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्राद्वारे हवालदारयांना त्रास व्हावा वा त्यांची बदली करावी हा उद्देश मुळीच नाही़ हेल्मेट, सीटबेल्ट, नो हॉर्न डे सारखे चांगले उपक्रम राबवून जनतेच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण करणा-या आयुक्तांच्या प्रतिमेस नक्कीच छेद जातो आहे़
- नितीन मंडलिक, पोलीस हवालदार, सिन्नर पोलीस ठाणे
टोर्इंगसंदर्भात उपस्थित केलेले प्रश्न
* टोर्इंग प्रक्रिया सुरू असताना जागेवर पोहोचलेल्या वाहनधारकाकडून जागेवर दंड वसूल करण्याचा नियम असतानाही चारचाकी वाहतूक शाखेत टोर्इंग करून नेण्यात फायदा नक्की कोणाचा? पोलीस विभागाचा की टोर्इंग ठेकेदाराचा?
* टोर्इंगवरील हवालदारास पोलीस आहे असे सांगण्याऐवजी साडेतीनशे रुपये लाच म्हणून दिले असते तर माझा मनस्ताप वाचला असता का?
* पोलीस खात्यात नोकरी करण्याऐवजी राजकीय पक्षाचा पदाधिकारी, आमदार, खासदार, नगरसेवक, गुन्हेगार असतो तर कार टोर्इंग केली असती का?
* पोलीस दलात कार्यरत असल्याचे सांगूनही वाहतूक पोलिसांकडून माझ्यावर नियमबाह्य कारवाई तर मग सर्वसामान्यांचे काय?