त्र्यंबकेश्वर पंचायत समितीतील लाचखोर सहायक लेखाधिकाºयास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 04:14 PM2017-10-03T16:14:28+5:302017-10-03T16:24:20+5:30
नाशिक : त्र्यंबकेश्वर पंचायत समितीतील सेवानिवृत्त औषधनिर्माण अधिकाºयास सहाव्या वेतन आयोगाचा फरकाची रक्कम देण्यासाठी आठ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारणाºया सहायक लेखाधिकारी एस़एऩशिंदे यास नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि़०३) दुपारच्या सुमारास रंगेहाथ पकडले़ या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे़
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार त्र्यंबकेश्वर पंचायत समितीतील औषधनिर्माण अधिकारी जयराम बुधा अहिरे हे सेवानिवृत्त झाले आहेत़ त्यांची सहाव्या वेतन आयोगातील फरक ६७ हजार रुपये निघाल्याने तो मिळावा यासाठी त्यांनी पंचायत समितीत अर्ज केले होते़ वेतन आयोगातील हा फरक देण्यासाठी पंचायत समितीतील सहायक लेखाधिकारी एस़एऩशिंपी (राग़ंगावाडी, नाशिक) यांनी आठ हजार रुपये लाचेची मागणी केली होती़ याबाबत अहिरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती़
तक्रारदार अहिरे यांच्या फिर्यादीवरून लाचलुचपत विभागाने मंगळवारी पंचायत समिती कार्यालयात सापळा रचला होता़ सहायक लेखाधिकारी शिंपी यांनी अहिरे यांच्याकडून दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पंचायत समिती कार्यालय परिसरात लाचेची रक्कम स्वीकारताच रंगेहाथ पकडण्यात आले़ विशेष म्हणजे गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांनी सेवानिवृत्त अधिकारी वा कोणत्याही कामासाठी आलेल्या नागरिकांची अडवणूक न करण्याबाबत परिपत्रक काढले होते़
दरम्यान, या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहायक लेखाधिकारी शिंदे यास ताब्यात घेतले असून त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे़