नाशिकमध्ये चारीत्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणा-या पतीस जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 04:51 PM2017-11-20T16:51:45+5:302017-11-20T16:57:15+5:30

nashik,wife,murder,husband,life,imprisonment,conviction | नाशिकमध्ये चारीत्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणा-या पतीस जन्मठेप

नाशिकमध्ये चारीत्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणा-या पतीस जन्मठेप

Next
ठळक मुद्देपत्नीवर चारीत्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर फाशी घेतल्याचा बनाव

नाशिक : एसटीमध्ये कंडक्टर असलेल्या पत्नीचा चारीत्र्याच्या संशयावरून गळा आवळून खून केल्यानंतर फाशी घेतल्याचा बनाव करून फरार झालेला आरोपी अरूण पांडूरग मुकणे (शिवामृत सोसायटी, एकता नगर,बोरगड, नाशिक) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश यू़एम़नंदेश्वर यांनी सोमवारी (दि़२०) जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ २८ सप्टेंबर २०१४ रोजी म्हसरूळ परिसरातील एकता नगरमध्ये ही घटना घडली होती़ अ‍ॅड़दिपशिखा भिडे -भांड यांनी या खटल्यात सरकारी वकील म्हणून काम पाहिले़
बोरगड कॉलनीतील शिवामृत सोसायटीत राहणारा आरोपी अरुण पांडूरंग मुकणे हा पत्नी रंजनासोबत राहत होता़ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात कंडक्टर पदावर नोकरीस असलेल्या रंजनाच्या चारित्र्यावर पती अरूण संशय घेत असल्याने त्यांच्यात नेहेमी वाद होत असे़ या वादामुळे रंजना म्हसरूळ गावात राहणारे वडील लक्ष्मण रामा पोटींदे (रा़म्हसरूळ)यांच्याकडे राहण्यासाठी गेली व तेथूनच नोकरीवर जात होती़ २८ सप्टेंबर २०१४ रोजी अरूणला सासºयांनी समजावल्यानंतर तो पत्नीस घेऊन गेला़ दुसºया दिवशी २९ सप्टेंबरला मुलगी फोन का उचलत नाही म्हणून पोटींदे मुलीच्या घरी गेले असता तिचा खून करून जावई फरार झाल्याचे आढळले़ या प्रकरणी पोटींदे यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़
जिल्हा व सत्र न्यायाधीश नंदेश्वर यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील पौर्णिमा नाईक यांनी १४ साक्षीदार तपासून आरोपी मुकणेविरोधात सबळ पुरावे सादर केले़ तर अ‍ॅड़ दीपशिक्षा भिडे - भांड यांनी युक्तीवाद केला़ साक्षीदारांमध्ये फिर्यादी पोटींदे व जिल्हा रुग्णालयातील डॉग़ायधनी यांची साक्ष महत्वाची ठरली़ न्यायाधीशांनी समोर आलेल्या पुराव्यांवरून मुकणे यास दोषी धरीत जन्मठेप, पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने कारावासाची शिक्षा सुनावली़

Web Title: nashik,wife,murder,husband,life,imprisonment,conviction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.