नाशिकच्या विद्यार्थ्याला फेसबुककडून दहा हजार डॉलर

By admin | Published: May 16, 2017 01:08 AM2017-05-16T01:08:31+5:302017-05-16T02:05:24+5:30

पेठ : कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर सामान्य कुटुंबातील विद्यार्थीही असामान्य कर्तृत्व सिद्ध करू शकतात याचेच ज्वलंत उदाहरण जयेश अहिरे या विद्यार्थ्याने दाखवून दिले आहे.

Nasik's student gets $ 10,000 from Facebook | नाशिकच्या विद्यार्थ्याला फेसबुककडून दहा हजार डॉलर

नाशिकच्या विद्यार्थ्याला फेसबुककडून दहा हजार डॉलर

Next

 

रामदास शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर सामान्य कुटुंबातील विद्यार्थीही असामान्य कर्तृत्व सिद्ध करू शकतात याचेच ज्वलंत उदाहरण नाशिक येथील जयेश अहिरे या विद्यार्थ्याने दाखवून दिले आहे. जयेश आहिरे सध्या जगभर गाजत असून, कंपनीत काम करणाऱ्या कामगाराच्या मुलाला फेसबुकने तब्बल दहा हजार डॉलरचे (६ लाख ५० हजार रुपये) बक्षीस प्रदान केले आहे.
फेसबुकसह इतर सर्वच सोशल मीडिया साइटमध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी असतात. त्यामुळे या साइटचा वापर करणाऱ्या खातेदारांचा डाटा असुरक्षित होऊ शकतो. अशाच प्रकारची फेसबुकमध्ये राहून गेलेली त्रुटी
मूळच्या नाशिकच्या व सध्या पुणे येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या जयेश बापू अहिरे या विद्यार्थ्याने शोधून काढली. एखाद्याने फेसबुकवर अपलोड केलेला एखादा फोटो वापर करणाऱ्याची परवानगी न घेता दुसऱ्याला बदलता किंवा काढून टाकता येऊ शकत होता. अशा प्रकारची त्रुटी शोधून काढल्यानंतर जयेशने ईमेलद्वारे फेसबुकला ही बाब निदर्शनास आणून दिली. प्रारंभी जयेशचे म्हणणे कंपनीने फारसे मनावर न घेतल्याने त्याने फेसबुकच्या टेस्टिंग प्रोफाइलमध्ये बदल करून त्याचे सविस्तर छायाचित्रण कंपनीला सादर केले. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या फेसबुकने जयेशशी संपर्क साधून सदर त्रुटीबाबत अधिक माहिती जाणून घेतली. कंपनीला खात्री पटल्यानंतर जयेशला तब्बल दहा हजार डॉलरचे (भारतीय चलनात ६ लाख ५० हजारांचे) बक्षीस प्रदान केले. जयेशचे वडील बापू सुकदेव अहिरे हे नाशिकच्या एका खासगी कंपनीत कामगार असून, आई विद्या या शिवणकाम करून मुलांचे शिक्षण व कुटुंबाच्या खर्चाला हातभार लावतात. जयेश सध्या सिंहगड महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असून, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जयेशने आपले शिक्षण घेतले आहे. अतिशय कमी वयात मिळालेल्या या बक्षिसाचे श्रेय तो आपल्या आई-वडिलांना देतो.
 

Web Title: Nasik's student gets $ 10,000 from Facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.