‘नॅट’मुळे आता सुरक्षित रक्त पुरवठा
By admin | Published: June 6, 2014 12:55 AM2014-06-06T00:55:34+5:302014-06-06T00:55:34+5:30
‘सुरक्षित रक्त व रक्त घटक पुरविणे’ हे रक्तपेढीचे ब्रीद आहे. अलीकडेच रक्त व रक्त घटकांच्या सुरक्षेसंदर्भातील पूर्णत: स्वयंचलित असलेले जगातील सर्वात अत्याधुनिक नॅट (न्यूलिक अँसिड अँम्पलिफिकेशन
चाचणीत आढळले दोन एचआयव्ही पॉझिटिव्ह
नागपूर : ‘सुरक्षित रक्त व रक्त घटक पुरविणे’ हे रक्तपेढीचे ब्रीद आहे. अलीकडेच रक्त व रक्त घटकांच्या सुरक्षेसंदर्भातील पूर्णत: स्वयंचलित असलेले जगातील सर्वात अत्याधुनिक नॅट (न्यूलिक अँसिड अँम्पलिफिकेशन टेक्नॉलॉजी) तंत्रज्ञान दाखल झाले आहे. या तंत्रज्ञानामुळे सुरक्षित रक्त पुरविणे शक्य झाले आहे, अशी माहिती लाईफ लाईन रक्तपेढीचे संचालक डॉ. हरीश वरभे यांनी आज पत्रपरिषदेत दिली.
मध्यभारतात पहिल्यांदाच ‘नॅट’ हे तंत्रज्ञान ‘लाईफ लाईन रक्तपेढीत’ दाखल झाले आहे. या संदर्भात माहिती देताना डॉ. वरभे म्हणाले, रुग्णाला रक्त देताना चार प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. त्यामध्ये एड्स (एचआयव्ही-१, एचआयव्ही-२), हिपॅटायटिस (कावीळ)- बी, हिपॅटायटिस-सी, गुप्तरोग आणि मलेरिया. या रोगजंतूसाठीच्या चाचण्या करून रक्तात रोगजंतू नसल्याची खात्री केली जाते. पूर्वी या चाचण्याचा अहवाल प्रचलित इलिसा तंत्रज्ञानाच्या निष्कर्षावर काढला जायचा. यात विशेषत: एचआयव्ही चाचणीचा रिपोर्ट यायला विंडो पिरियड कालावधी ३0 दिवसांचा लागायचा. यात दूषित रक्त रुग्णाला जाण्याची शक्यता असायची. आता या ‘नॅट’ तंत्रज्ञानाने केवळ सहा ते आठ दिवसांमध्ये या चाचणीचा अहवाल कळतो. जेथे ‘कावीळ बी’ निष्पन्न होण्याचा कालावधी इलिसाने ५८ दिवसांचा आहे, तेथे नॅटने हे १२ ते १५ दिवसांमध्ये होते. इलिसाने ‘कावीळ सी’साठी ७0 दिवस लागत असून नॅटने ते फक्त ८ ते १२ दिवसांच्या कालावधीत निष्पन्न होते. या तंत्रज्ञानामुळे विषाणूंचा संसर्ग आदी सुरुवातीच्या काळात, लवकरात लवकर अचूकपणे शोधणे शक्य झाले आहे.
लाईफ लाईन रक्तपेढीमध्ये ‘नॅट’ तंत्रज्ञान पूर्णत: अँटोमॅटिक आहे. हे तंत्रज्ञान आल्यापासून आतापर्यंंंत सुमारे ४५0 ते ५00 जणांच्या रक्ताची नॅट तपासणी करण्यात आली. यातील दोघे एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचा धक्कादायक अहवाल आला. ‘इलिसा’ तंत्रज्ञानात एवढय़ा लवकर निदान होणे शक्यच नव्हते. सुरक्षित रक्त पुरवठा आता खर्या अर्थाने शक्य झाले आहे. नॅट तंत्रज्ञान असलेले नागपूर शहर हे विसावे शहर झाले आहे. कर्नाटकमध्ये दीड वर्षांंंपूर्वीच शासकीय रुग्णालयांमध्ये नॅट तपासणी आवश्यक केली आहे. रक्तपेढीतील या नॅट लॅब ‘पँथर’चे उद्घाटन ७ जून रोजी पद्मश्री डॉ. आर.डी. लेले यांच्या हस्ते होईल, असेही त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेत रक्तपेढीच्या संचालिका डॉ. वनश्री वरभे उपस्थित होत्या.(प्रतिनिधी)