नथुराम गोडसे खुनीच -मुख्यमंत्री

By admin | Published: December 13, 2014 01:56 AM2014-12-13T01:56:08+5:302014-12-14T13:48:57+5:30

नथुराम गोडसे याने महात्मा गांधी यांची हत्या केली आहे. तो खुनीच आहे. त्यामुळे गोडसेचा कुठल्याही प्रकारे गौरव करणो राज्य सरकार खपवून घेणार नाही.

Nathuram Godse Khunech - Chief Minister | नथुराम गोडसे खुनीच -मुख्यमंत्री

नथुराम गोडसे खुनीच -मुख्यमंत्री

Next
नागपूर : नथुराम गोडसे याने महात्मा गांधी यांची हत्या केली आहे. तो खुनीच आहे. त्यामुळे गोडसेचा कुठल्याही प्रकारे गौरव करणे राज्य सरकार खपवून घेणार नाही. असे प्रयत्न करणा:यांवरही कडक कारवाई केली जाईल, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडली. 
राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी यासंबंधीचा मुद्दा उपस्थित केला होता. एका संघटनेने गोडसे याचा जन्मदिवस पनवेलमध्ये शौर्य दिवस म्हणून साजरा केला. भारतीय लोकशाहीने ज्या खुन्याला फाशी दिली त्याचा असा गौरव केला जात असेल तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे, असे ते म्हणाले.
 
21 जून रोजी जगभर ‘योगदिन’ साजरा होणार आहे. महाराष्ट्रातही हा दिवस साजरा करण्यासाठी एक समिती नेमली जाईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत केली. आ. राम कदम यांनी पंतप्रधानांची सूचना संयुक्त राष्ट्र संघटनेने मान्य केल्याने पंतप्रधानांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्याची मागणी केली. फडणवीस यांनी त्याला समर्थन दिले.
 
विदर्भाच्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांकडून दखल 
नागपूर : वेगळ्या विदर्भाची मागणी करीत गेल्या चार दिवसांपासून 10 विदर्भवीर नागपुरातील शहीद चौकात उपोषणाला बसले आहेत. यातील तीन जणांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या आंदोलनाची दखल घेऊन सरकारने वेगळ्या विदर्भाबाबत असलेली भूमिका जाहीर करावी, अशी मागणी भाजपाचे आ. विकास कुंभारे यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्री स्वत: उपोषणकत्र्याची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती करतील, असे आश्वस्त केले. 
 

 

Web Title: Nathuram Godse Khunech - Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.