ठरलं ! शिवजयंतीपासून शाळा, महाविद्यालयात राष्ट्रगीत अनिवार्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 03:38 PM2020-02-12T15:38:42+5:302020-02-12T15:40:37+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्या शासकीय तारखेनुसार येणाऱ्या जयंतीपासून अर्थात १९ फेब्रुवारीपासून राज्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीत म्हणणे  अनिवार्य करणार असल्याची घोषणा उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुण्यात केली. 

National anthem compulsory from Shiv Jayanti to school, college; Uday Samant | ठरलं ! शिवजयंतीपासून शाळा, महाविद्यालयात राष्ट्रगीत अनिवार्य

ठरलं ! शिवजयंतीपासून शाळा, महाविद्यालयात राष्ट्रगीत अनिवार्य

Next

पुणे :  छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्या शासकीय तारखेनुसार येणाऱ्या जयंतीपासून अर्थात १९ फेब्रुवारीपासून राज्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीत म्हणणे अनिवार्य करणार असल्याची घोषणा उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुण्यात केली. 

विविध कार्यक्रमांसाठी ते आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. 

पुढे ते म्हणाले की, 'सध्या राज्यात इंजिनिअरिंगच्या 50 ते 52 टक्के जागा भरल्या जात नाहीत. त्या भराव्यात यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. याशिवाय प्रत्येक कॉलेज तंबाखूमुक्त असावेत यासाठी काटेकोरपणे प्रयत्न करणार आहोत. याकरिता कायद्याचे रूपांतर शासननिर्णयात होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

  मुलींच्या सुरक्षिततेसाठी मुलांमध्ये योग्य प्रबोधन व्हावं, जनजागृती निर्माण व्हावी यासाठी काही सेशन घेणार आहोत.मुलींची छेडछाड होणार नाही याबाबत काळजी घेतली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.त्यासाठी  शिक्षक, प्राचार्य यांना प्रशिक्षण केंद्र उभारणार असून सरकार त्यावर  60 कोटी खर्च करणार  करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. 

Web Title: National anthem compulsory from Shiv Jayanti to school, college; Uday Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.