नॅशनल हायवे फोर्टी फोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2016 02:33 AM2016-10-21T02:33:38+5:302016-10-21T04:02:33+5:30

जागतिकीकरणानंतरच्या गेल्या पंचवीस वर्षांतल्या भारताने कित्येकांच्या स्वप्नांना पंख दिले... किती जण पुढे घुसले, कित्येक मागे ढकलले गेले. किती गोष्टी बदलल्या, कित्येक रखडल्या...

National Highway Faulty Four | नॅशनल हायवे फोर्टी फोर

नॅशनल हायवे फोर्टी फोर

Next

३७४५ किलोमीटर्स, ११ राज्यं, ३५ दिवस,
३४ रात्री आणि ७ कलंदर भटके

शांत संथ कन्याकुमारीपासून उकळत्या श्रीनगरपर्यंतचा प्रवास... पस्तीस दिवसांची, चौतीस रात्रींची रोडट्रीप...
त्या प्रवासात भेटलेल्या गावांच्या, शहरांच्या, विजयांच्या, पराभवांच्या, बदलांच्या आणि बदलत्या माणसांच्या कहाण्या!!

जागतिकीकरणानंतरच्या गेल्या पंचवीस वर्षांतल्या भारताने कित्येकांच्या स्वप्नांना पंख दिले...
किती जण पुढे घुसले, कित्येक मागे ढकलले गेले. किती गोष्टी बदलल्या, कित्येक रखडल्या...
काय बदललं आणि किती बिघडलं, काय पेटलं आणि कोण विझलं यांचा हिशेब मांडण्यासाठी
अख्ख्या देशाच्या हृदयातून धावत भारताचं दक्षिण आणि उत्तर टोक जोडणाऱ्या सर्वाधिक लांबीच्या राजमार्गावरची रोडट्रीप

माणसं रस्त्यावर का उतरतात?
- रागाचा बॉम्ब फोडायला, ‘सिस्टिम’शी भांडायला,
विरोधाचा वचपा काढायला, रस्ता अडवायला!
आम्हीही उतरतो आहोत रस्त्यावर!
- पण रागावून भांडायला नव्हे,
ऐन पंचविशीत पोचलेल्या ‘ग्लोबल’ भारताची
‘लोकल’ रहस्यं शोधायला!!
-आणि तेही लेखक, पत्रकार, विचारवंत यांच्याशी नव्हे,
नव्या जगात नवे मार्ग शोधण्याची हिंमत धरणाऱ्या
रस्त्यावरच्या माणसांशी बोलून!!
त्यांचाबरोबर राहून, जेवून-खावून, भटकून!

----------------

दीपोत्सवची झलक बघण्यासाठी, तसेच ऑनलाइन ऑर्डर देण्यासाठी इथे क्लिक करा...

Web Title: National Highway Faulty Four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.