व्याघ्र प्रकल्पातील राष्ट्रीय महामार्ग बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 04:41 AM2018-04-24T04:41:48+5:302018-04-24T04:41:48+5:30

एनटीसीएकडून सर्वेक्षणाचे आदेश : वन्यपशूंच्या अपघाती मृत्यूबाबत शासन चिंतित

National highway in Tiger reserves will change | व्याघ्र प्रकल्पातील राष्ट्रीय महामार्ग बदलणार

व्याघ्र प्रकल्पातील राष्ट्रीय महामार्ग बदलणार

Next

गणेश वासनिक ।
अमरावती : राज्यात व्याघ्र प्रकल्पातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गामुळे वाघांसह इतर वन्यपशुंच्या वाढत्या अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्या संख्येने शासन चिंतीत आहे. त्यामुळे वन्यपशुंचे अपघात रोखण्यासाठी व्याघ्र प्रकल्पातील मार्ग बदलविण्याचा प्रस्ताव असून, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन समितीने (एनटीसीए) सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. विशेषत: महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
एनटीसीएने देशभरातील व्याघ्र प्रकल्प क्षेत्रसंचालकांकडून जंगलातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गांची माहिती मागविली आहे.
या मार्गामुळे आतापर्यंत अपघातात झालेल्या वन्यपशुंची आकडेवारी नमूद करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील पेंच, ताडोबा, मेळघाट, बोर अभयारण्य, सह्याद्री, टिपेश्वर आदी व्याघ्र प्रकल्पातील क्षेत्रसंचालकांनी त्याअनुषंगाने सर्वेक्षण सुरू केले आहे. यापूर्वी एनटीसीएच्या सर्वेक्षणानुसार २०१२ ते २०१७ या कालावधीत
रस्ते आणि रेल्वे अपघातात सुमारे
चार लाख वन्यपशू मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक बाब
समोर आली आहे.
वन्यपशुंचे अपघात रोखण्यासाठी व्याघ्र प्रकल्पांचे संवर्धन, संरक्षण करण्यासंदर्भात कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

‘जयचंद’ वाघ दीड महिन्यापासून बेपत्ता
च्भिवापूर (नागपूर) : जय हा वाघ दोन वर्षांपासून बेपत्ता असतानाच आता त्याचा बछडा ‘जयचंद’चेही ‘लोकेशन’ दीड ते दोन महिन्यांपासून मिळेनासे झाले आहे. नागपुरातील उमरेड-कºहांडला आणि भंडाºयातील पवनी व चंद्रपुरातील नागभीड आणि तळोधी वनपरिक्षेत्रात त्याच्या पाऊलखुणाही दिसत नसताना; वन विभागाकडून त्याला शोधण्यासाठी हालचाली होताना दिसत नाहीत.
च्उमरेड-कºहांडला अभयारण्याची ‘ओळख’ ठरलेला जय १८ एप्रिल २०१६पासून बेपत्ता आहे. त्याच्याप्रमाणेच शरीरयष्टी व रुबाब असलेला जयचंद हा जयची उणीव भरून काढत होता. मात्र तोही अचानक बेपत्ता झाला. त्याचे शेवटचे लोकेशन फेब्रुवारी २०१८ मध्ये ब्रह्मपुरी (जिल्हा चंद्रपूर) वनपरिक्षेत्रात आढळल्याचे वनअधिकाºयांनी सांगितले, तो कालव्यात पडला.  वनअधिकाºयांच्या अनास्थेमुळे जयचंद १० जानेवारी २०१८ रोजी गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात पडला होता. त्याच्या सध्याच्या लोकेशनबाबत पवनी वनपरिक्षेत्राचे आरएफओ (वन्यजीव) बाबा राऊत यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

बफर झोनमधील रस्ते धोकादायक
ताडोबा व्याघ्र प्रकल्पांतर्गत बफर झोन असलेल्या मध्य चांदा विभाग, चंद्रपूर वनविकास महामंडळातून जाणारा रस्ता, तर मूल- चंद्रपूर, बल्लारशा-चंद्रपूर ही रेल्वे लाईन वन्यपशुंसाठी अतिशय धोकादायक असल्याचे वनाधिकाºयांचे मत आहे. मेळघाटातून मध्यप्रदेशकडे, नवेगाव बांधमधून रायपूरमार्गे छत्तीसगड, सह्यांद्री अभयारण्यातून कोल्हापूर, गोव्याकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग वन्यजीवांसाठी घातक ठरणारा आहे.
जंगलातून जाणाºया रस्त्यांचे सर्वेक्षण करून अहवाल पाठविण्याच्या सूचना आहेत. वस्तुनिष्ठ अहवाल एनटीसीएकडे पाठविला जाईल.
- सुनील लिमये, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव नागपूर

Web Title: National highway in Tiger reserves will change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ