National Inter-Religious Conference: राजकीय दहशतवादापासून मोठा धोका; ते देश, समाज चालवत नाहीत : रामदेव बाबा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 12:34 PM2021-10-24T12:34:32+5:302021-10-24T12:36:57+5:30

Baba Ramdev speech in National Inter-Religious Conference in Nagpur: आपला विकास झाला पाहिजे. ज्ञान, तंत्रज्ञान, संशोधनाचा वापर मानवाच्या विकासासाठी करणे हा धर्म आहे. धर्माच्या नावावर राम नाम जपना, पराया माल अपना. हा कोणता संन्यास आहे, असा सवाल रामदेव बाबांनी केला.

National Inter-Religious Conference: Baba Ramdev speak on political terrorism, medical terrorism, religion, India's growth, society | National Inter-Religious Conference: राजकीय दहशतवादापासून मोठा धोका; ते देश, समाज चालवत नाहीत : रामदेव बाबा

National Inter-Religious Conference: राजकीय दहशतवादापासून मोठा धोका; ते देश, समाज चालवत नाहीत : रामदेव बाबा

Next

या जगासाठी सर्वात मोठा धोका हा जातीय दहशतवाद, आर्थिक दहशतवाद, राजकीय दहशतवाद आणि मेडिकल दहशतवादापासून आहे. मेडिकलवाल्यांबाबत मधे मी बोललेलो तेव्हा मोठा गोंधळ उडाला होता. राजकीय दहशतवाद सर्वात वर आहे, जातीय दुसऱ्या क्रमांकावर. सर्व धर्म नाहीतर सर्व पंथ असे नाव असायला हवे. पाण्याचा एक धर्म, आगीचा एक धर्म, वाऱ्याचा एक धर्म असतो. त्यामुळे सर्व मानव जातीचा धर्म एकच असणार, असे योगगुरु आणि हरिद्वारच्या पतंजली योगपीठाचे संस्थापक रामदेव बाबा (Baba Ramdev) म्हणाले. 

‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आज नागपुरात राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘धार्मिक सौहार्दाबाबत वैश्विक आव्हाने व भारताची भूमिका’ या विषयावर या परिषदेमध्ये विविध धर्मांच्या आचार्यांच्या उपस्थितीत महामंथन होत आहे. या परिषदेच्या माध्यमातून जगभरात धार्मिक सद‌्भावनेचा संदेश जाणार आहे. ( Lokmat National Inter-Religious Conference in Nagpur)

आम्ही सर्वांना हिंदू बनवू, मुस्लिम बनवू, इसाई बनवू यापेक्षा आम्ही सर्वांना माणूस बनवू असे म्हटले पाहिजे. सर्व जगातील धर्माचार्य एकाच स्वरात म्हणाले की, आम्ही सारे एक आहोत तर किती चांगले होईल. कोणीतरी येतो, म्हणतो ब्राम्हण महान, ओबीसी महान, क्षत्रिय महान, शूद्र महान, हे काय आहे. आपण सारे एक आहोत. आपला विकास झाला पाहिजे. ज्ञान, तंत्रज्ञान, संशोधनाचा वापर मानवाच्या विकासासाठी करणे हा धर्म आहे. धर्माच्या नावावर राम नाम जपना, पराया माल अपना. हा कोणता संन्यास आहे. काही लोक संन्यासी होतात, लाडू खाऊन आपल्याला लोकांनी संन्यासी म्हणावे, अशी या लोकांची अपेक्षा असते. आपण एकाच देवाची मुले आहोत. एकाच धरतीवर राहतो असे सर्वांनी म्हणायला हवे, असे रामदेव बाबा म्हणाले. 

मला असे कोणते काम असे करायचे नाहीय की माझा देश बदनाम होईल. एका अशिक्षित आई बापाच्या घरातून निघालेला माझ्यासारखा मुलगा सात भाषा बोलतो. मराठी, इंग्रजीही बोलतो. तुमच्या विचारात दोष असता नये, तुम्ही कुठून शिकला, कुठून आला हे विचारात घेतले जाऊ नये, असे रामदेव बाबा म्हणाले. 

सर्व सृष्टी देवाच्या विधानाने चालते. देश संविधानाने तर समाज अध्यात्माच्या आधारे चालतो. राजकीय नेते समाज चालवत नाहीत. समाज तपस्वींनी बनविला. भारताला मुख्यत्वे ऋषीमुनींनी बनविले. साधने वेगवेगळी असू शकतात, साध्य वेगळे असू शकत नाही. सर्वात मोठा धर्म हा आपला कर्म असतो. कर्म आपले पवित्र असावेत, यासाठी विवेक आणि भावाची पवित्रता असावी लागते, अशा शब्दांत रामदेव बाबांनी धर्माची भाषा सांगितली.

कोरोनाने काय सांगितले...
आता कोरोनाने सर्वांना सांगतलेय, तुम्ही योग केला नाही तर श्वास थांबेल. एका छोटा कोरोना माणसाला घाबरवतो. काय ऐपत आहे कोरोनाची. एक छोटासा मच्छर माणसाला त्रास देतो. कोणाची ताकद जास्त. स्वर्गात देखील माझ्यावर टीका होते. बाबा आमचे इनकमिंग बंद केले, असे म्हणताच सभागृहात हशा पिकला. 
 

Web Title: National Inter-Religious Conference: Baba Ramdev speak on political terrorism, medical terrorism, religion, India's growth, society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.