National Inter-Religious Conference: ...म्हणून मला नितीन गडकरींचे 'वजन' कमी करायचेय; रामदेव बाबांनी केली स्तुती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 13:19 IST2021-10-24T13:18:19+5:302021-10-24T13:19:43+5:30
Baba Ramdev talk about Nitin Gadkari, Vijay Darda in Nagpur: व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, लोकमत समुहाचे लोकमत’ एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह विविध धर्मांचे आचार्य उपस्थित होते. यावेळी रामदेव बाबांनी गडकरी आणि विजय दर्डा यांच्या वजनाचा धागा पकडला.

National Inter-Religious Conference: ...म्हणून मला नितीन गडकरींचे 'वजन' कमी करायचेय; रामदेव बाबांनी केली स्तुती
काही वर्षांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी (Nitin Gadkari) चर्चा झाली होती, हरिद्वारला जायला बराच वेळ लागतो. गडकरींनी हा रस्ता बनवत आमचा प्रवास 2.30 तासांचा केला, इंधन वाचविले. ते भारत भाग्यविधाता आहेत. गडकरींचे 20 किलो वजन कमी करायचे आहे. त्यांना देशासाठी आणखी 50 वर्षे जगायचे आहे, अशा शब्दांत योगगुरु आणि हरिद्वारच्या पतंजली योगपीठाचे संस्थापक रामदेव बाबा (Baba Ramdev) यांनी स्तुती केली.
‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आज नागपुरात राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘धार्मिक सौहार्दाबाबत वैश्विक आव्हाने व भारताची भूमिका’ या विषयावर या परिषदेमध्ये विविध धर्मांच्या आचार्यांच्या उपस्थितीत महामंथन होत आहे. या परिषदेच्या माध्यमातून जगभरात धार्मिक सद्भावनेचा संदेश जाणार आहे. ( Lokmat National Inter-Religious Conference in Nagpur)
व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, लोकमत समुहाचे लोकमत’ एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह विविध धर्मांचे आचार्य उपस्थित होते. यावेळी रामदेव बाबांनी गडकरी आणि विजय दर्डा यांच्या वजनाचा धागा पकडला. दोघेही मला मोठ्या भावासारखे आहेत. नितीन गडकरी आणि विजय दर्डा यांच्यात मला स्पर्धा लावायची आहे. गडकरींचे 20 किलो वजन कमी करायचे आहे. त्यांना हरिद्वारला बोलविणार आहे. विजय दर्डा यांनी वजन कमी केलेले पुन्हा वाढविले. त्यांनाही बोलविणार आहे. तिथेच तुमच्यात स्पर्धा होईल, असे रामदेव बाबा म्हणाले. गडकरींना, दर्डांना आणखी पन्नास वर्षे देशासाठी जगायचे आहे. भारताला परम वैभवशाली बनविणार नाही, तोवर आम्हाला काम करायचे आहे, असेही रामदेव म्हणाले.
विजय दर्डांचीही स्तुती, लोकमतला शुभेच्छा...
विजय दर्डा हे कोणत्याही पक्षामध्ये असले तरी त्यांच्यासाठी राष्ट्रधर्म हा प्रथम आहे. 9-10 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अहमदाबादमध्ये त्यांनी असे भाषण केले होते की पुढचे दोन तीन दिवस चर्चेत होते. हा माणूस सर्वांसाठी बनलाय. हा माणूस देशासाठी बनलाय. लोकमत पुढे 100 वर्षे वाटचाल करणार. मी तेव्हा पुन्हा येणार आहे. मी आणखी 75 वर्षे जगणार आहे, अशा शब्दांत रामदेव बाबांनी लोकमत समुहाला शुभेच्छा दिल्या.