राष्ट्रीय मास्टर्स अॅथेलेटिक्स : प्रौढ खेळाडूंनी गाजविले मैदान
By admin | Published: March 26, 2017 10:03 PM2017-03-26T22:03:50+5:302017-03-26T22:03:50+5:30
रणरणत्या उन्हात शहराच्या तपमानाचा पारा चाळीशीवर पोहचलेला असताना सोळा राज्यांमधून आलेल्या शेकडो प्रौढ महिला, पुरूष खेळाडूंनी विविध अॅथेलेटिक क्रिडाप्रकारांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग
नाशिक : रणरणत्या उन्हात शहराच्या तपमानाचा पारा चाळीशीवर पोहचलेला असताना सोळा राज्यांमधून आलेल्या शेकडो प्रौढ महिला, पुरूष खेळाडूंनी विविध अॅथेलेटिक क्रिडाप्रकारांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेत तरूण खेळाडूंना लाजवेल असे प्रदर्शन करून चारशे क्रिडा प्रकारांचे मैदान गाजविले.
निमित्त होते, ३७व्या राष्ट्रीय मास्टर्स अॅथेलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेचे. नाशिकला नव्हे तर महाराष्ट्राला प्रथमच भारतीय मास्टर्स अॅथेलेटिक्स संस्थेकडून यजमानाचा बहुमान देण्यात आला होता. नाशिक जिल्हा मास्टर्स अॅथेलेटिक असोसिएशनकडून आयोजित या तीन दिवसीय स्पर्धेचा रविवारी (दि.२६) उत्साहात समारोप झाला.
हिरावाडी येथील मिनाताई ठाकरे क्रिडा संकुलामध्ये अॅथेलेटिक्स स्पर्धेला शुक्रवारी प्रारंभ झाला. महिला, पुरूष खेळाडूंनी मैदानी स्पर्धा, शंभर ते दहा हजार मीटरपर्यंत धावण्याच्या शर्यती, धावणे, गोळा फेक, थाळी फेक, हातोडा फेक, भाला फेक, लांब उडी, उंच उडी, तीहेरी उडी, बांबू उडी, पाच किलोमीटर चालणे आदि क्रिडाप्रकारांमध्ये तीस वर्षांपुढील सर्व महिला, पुरूष खेळाडूंनी विविध वयोगटातून सहभाग नोंदविला.