केंद्र शासनाकडून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा, राज्यातील 25 शिक्षकांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 07:54 PM2017-09-01T19:54:11+5:302017-09-01T19:56:53+5:30

केंद्र शासनाकडून दिल्या जाणाºया राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये राज्यातील २५ शिक्षकांचा समावेश

National Teacher Award Announcement by the Central Government, 25 teachers of the state included | केंद्र शासनाकडून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा, राज्यातील 25 शिक्षकांचा समावेश

केंद्र शासनाकडून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा, राज्यातील 25 शिक्षकांचा समावेश

Next
ठळक मुद्देकेंद्र शासनाकडून दिल्या जाणाºया राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये राज्यातील २५ शिक्षकांचा समावेश

पुणे, दि. 1 - केंद्र शासनाकडून दिल्या जाणाºया राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये राज्यातील २५ शिक्षकांचा समावेश असून सर्वाधिक पाच शिक्षक पुणे जिल्ह्यातील आहेत. २०१६-१७ या शैक्षणिक वर्षासाठी या शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.

शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºया शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार देवून दरवर्षी गौरविले जाते. यंदा राज्यातील २५ शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये प्राथमिकचे १७ व माध्यमिकच्या ८ शिक्षकांचा समावेश आहे. त्यामध्ये अनुक्रमे २ व १ असे एकुण तीन विशेष शिक्षक आहेत. जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये राज्यात पुणे जिल्ह्याने ठसा उमटविला आहे. जिल्ह्यातील पाच शिक्षकांची या पुरस्काराची निवड झाली आहे. त्याखालोखाल नाशिक जिल्ह्यातील ३ आणि मुंबई, अहमदनगर, बीड व लातुर जिल्ह्यातील प्रत्येकी २ शिक्षकांचा समावेश आहे. तसेच सांगली, बुलडाणा, भंडारा, ठाणे, सोलापूर, यवतमाळ, उस्मानाबाद, गडचिरोली आणि नागपुर या जिल्ह्यातील प्रत्येकी एका शिक्षकाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची यादी -

प्राथमिक विभाग -

१. नागोराव तायडे (जयंतीलाल वैष्णव मार्ग, महापालिका मराठी शाळा, घाटकोपर, मुंबई)

२. उज्वला नांदखिले (जि. प. शाळा, साडेसतरा नळी, ता. हवेली, जि. पुणे)

३. शोभा माने (जि. प. शाळा क्र.१, चिंचणी, ता. तासगांव, जि. सांगली)

४. तृप्ती हातिसकर (प्रभादेवी मनपा शाळा क्र.२,  मुंबई)

५. सुरेश शिंगणे (जि. प. शाळा, पिंपळगाव चिलमखा, ता. देऊळगाव राजा, जि. बुलडाणा)

६. संजीव बागुल (जि. प. शाळा, सांभवे, ता. मुळशी, जि. पुणे)

७. रसेशकुमार फाटे (जि. प. शाळा, डोंगरगाव, जि. भंडारा)

८. ज्योती बेळवले (जि. प. शाळा, केवनीदिवे, ता. भिवंडी, जि. ठाणे)

९. अर्जुन तकटे (जि. प. शाळा, अहेरगाव, ता. निफाड, जि. नाशिक)

१०. रुक्मीणी कोळेकर (जि. प. शाळा, वांगणी २, ता. करमाळा, जि. सोलापुर)

११. रामकिसन सुरवसे (जि. प. शाळा, नागोबावाडी, ता. औसा, जि. लातुर)

१२. प्रदीप शिंदे (जि. प. शाळा, शिलापुर, जि. नाशिक)

१३. अमिन चौहान (जि. प. शाळा, निंभा, ता. डिग्रस, जि. यवतमाळ)

१४. उर्मिला भोसले (जि. प. शाळा, महाळदापुरी, ता. वाशी, जि. उस्मानाबाद)

१५. गोपाळ सुर्यवंशी (जि. प. शाळा, गांजुरवाडी, जि. लातुर)

प्राथमिक विशेष शिक्षक

१. अर्चना दळवी (जि. प. शाळा, बहुली, ता. हवेली, जि. पुणे)

२.  सुरेश धारराव (जि. प. शाळा, निफाड क्र. २, ता. निफाड, जि. नाशिक)

माध्यमिक विभाग -

१. नंदा राऊत (मोतीलाल कोठारी विद्यालय, कडा, ता. आष्टी, जि. बीड)

२. स्मिता करंदीकर (अहिल्यादेवी हायस्कुल, शनिवार पेठ, पुणे)

३. नंदकुमार सागर (जिजामाता हायस्कुल, जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे)

४. शर्मिला पाटील (अंबिका विद्यालय, केडगाव, ता. अहमदनगर)

५. सुनिल पंडित (प्रगत विद्यालय, नवी पेठ, अहमदनगर)

६. डॉ. कमलाकर राऊत (योगेश्वरी नुतन विद्यालय, अंबेजोगाई, जि. बीड)

७. संजय नरलवार (प्रियांका हायस्कुल, कानेरी, जि. गडचिरोली)

माध्यमिक विशेष शिक्षक -

१. मिनल सांगोले (मुकबधिर शाळा, शंकर नगर, नागपुर)

Web Title: National Teacher Award Announcement by the Central Government, 25 teachers of the state included

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक