राष्ट्रवादी प्रभावशाली
By admin | Published: February 24, 2017 04:55 AM2017-02-24T04:55:54+5:302017-02-24T04:55:54+5:30
जिल्हा परिषदेत २५ जागा राखून राष्ट्रवादी काँगे्रस सर्र्वांत प्रभावशाली पक्ष ठरला असला तरी
बीड : जिल्हा परिषदेत २५ जागा राखून राष्ट्रवादी काँगे्रस सर्र्वांत प्रभावशाली पक्ष ठरला असला तरी सत्तेसाठी आवश्यक असलेले संख्याबळ गाठू शकला नाही. त्यामुळे सत्तेसाठी त्यांना काँग्रेससह इतर पक्षांशी तडजोड करण्याशिवाय पर्याय नाही.
ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर पुन्हा बंधू विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी मात करत परळीत भाजपाचा धुव्वा उडविला. सर्वच्या सर्व जागा राकॉ-काँग्रेसकडे राखण्यात त्यांनी यश मिळवले. बीडमध्येही काका-पुतण्याच्या लढाईत पुतण्या काकाला भारी ठरला. आ. जयदत्त क्षीरसागर यांच्या होमपिचवरच पुतणे संदीप यांनी त्यांना चारीमुंड्या चित केले. निवडणुकीच्या तोंडावरच राकॉला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत गेलेले माजी मंत्री बदामराव पंडित यांनीही गेवराईत करिश्मा करून दाखवला. त्यांनी नऊपैकी चार जागा मिळवल्या. आष्टीत माजी मंत्री सुरेश धस यांच्या पत्नी संगीता धस या राकॉच्या एकमेव उमेदवार विजयी झाल्या. तेथे भाजपचे आ. भीमराव धोंडे यांनी सातपैकी पाच जागा पटकावल्या. माजलगावात माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी भाजपचे आ. आर. टी. देशमुख यांना धक्का दिला. सहाही ठिकाणी राकॉच्या उमेदवारांनी विजय संपादन केला. आ. देशमुख यांचे पुत्र रोहित यांनाही पराभव पहावा लागला. माजी मंत्री सोळंके यांच्या पत्नी मंगल व पुतणे जयसिंह या दोघांनीही जोरदार मुसंडी मारली. शिवसंग्रामने चार ठिकाणी विजय मिळविला. (प्रतिनिधी)
बीड
पक्षजागा
भाजपा१९
शिवसेना०४
काँग्रेस०३
राष्ट्रवादी२५
इतर०९