नवी मुंबईत राष्ट्रवादी, औरंगाबादेत महायुती बहुमतापासून दूर
By Admin | Published: April 23, 2015 04:29 PM2015-04-23T16:29:23+5:302015-04-23T17:31:27+5:30
संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकांचे निकाल जाहिर झाले असून या दोन्ही निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकांचे निकाल जाहिर झाले असून या दोन्ही निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. नवी मुंबईत सर्वाधिक ५२ जागा मिळविणारा राष्ट्रवादी पक्ष ठरला असला तरी सत्ता स्थापण्यासाठी राष्ट्रवादीला काँग्रेसह अपक्षाची मदत घ्यावी लागणार आहे. तर दुसरीकडे औरंगाबाद महापालिकेत महायुतीला सर्वाधिक ५१ जागा मिळविण्यात यश आले असले तरी बहुमतापासून महायुती दूर आहे. महत्वाची बाब म्हणजे या निवडणुकीत एमआयएमने सर्वांचं लक्ष वेधत २५ जागांवर विजय मिळवित विरोधी पक्षाची जागा काबिज केले आहे.औरंगाबाद महापालिका निवडणुकीत एमआयएम किती जागा मिळविणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. औरंगाबादमध्ये सर्वाधिक नुकसान राष्ट्रवादीचे झाले असून राष्ट्रवादीला केवळ ३ जागा मिळविण्यात यश आले आहे. काँग्रेसच्या हक्काची मते एमआयएमकडे गेल्याने काँग्रेसला केवळ १० जागा मिळविता आल्या. तर या ठिकाणी अपक्षांचा सुध्दा बोलबाला राहिल्याचे दिसून आले. अपक्षाने २४ जागावर विजय मिळविला असल्याने सत्ता स्थापनेसाठी महायुतीला अपक्षांची खरी गरज लागणार आहे.
कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या ते खालीलप्रमाणे ...
औरंगाबाद महापालिका निवडणूक निकाल
शिवसेना - २९ जागा
एमआयएम - २५ जागा
भाजप - २२ जागा
काँग्रेस - १० जागा
बसपा - ०५ जागा
राष्ट्रवादी - ०३ जागा
रिपब्लिकन पक्ष ०१ जागा
अपक्ष - १८ जागा
एकूण - १११ जागा
नवी मुंबई महापालिका निवडणूक निकाल
राष्ट्रवादी - ५३ जागा
शिवसेना - ३७ जागा
काँग्रेस - १० जागा
भाजप - ०६
इतर पक्ष ०५ जागा
एकूण - १११ जागा