नवी मुंबईत राष्ट्रवादी - महायुतीत चुरशीची लढाई
By Admin | Published: April 23, 2015 10:55 AM2015-04-23T10:55:43+5:302015-04-23T12:40:58+5:30
नवी मुंबई महापाविका निवडणुकीचे निकाल लागायला सुरूवात झाली असून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व युतीत चुरशीची लढाई पहायला मिळत आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - नवी मुंबई महापाविका निवडणुकीचे निकाल लागायला सुरूवात झाली असून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व युतीतचुरशीची लढाई पहायला मिळत आहे. १११ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत आत्तापर्यंत राष्ट्रवादी ३६ तर युती ३२ जागांवर आघाडीवर आहे. तसेच काँग्रेस ८ आणि इतरांना ३ जागांवर आघाडी मिळाली आहे.
लोकसभा व विधानसभेतील पराभवानंतर नाईक कुटुंबासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई बनली आहे. तर शिवसेना- भाजपाने यावेळेस सत्ताधारी राष्ट्रवादीस सत्तेतून बाहेर फेकून पक्षाचे नेते गणेश नाईक यांटची सद्दी संपवण्याचा संकल्प केला असल्याने सर्वांचे लक्ष नवी मुंबईच्या निकालाकडे लागले आहे.
नवी मुंबईतील विजयी उमेदवार :
वॉर्ड क्र. १ उज्ज्वला झंजाळ (भाजप)
वॉर्ड क्र. २ शुभांगी गवते (शिवसेना)
वॉर्ड क्र. १० शशीकला सुतार (राष्ट्रवादी)
वॉर्ड क्र. ११ राजीव कांबळे (शिवसेना)
वॉर्ड क्र. १९ सुधाकर सोनवणे (अपक्ष)
वॉर्ड क्र. २६ सूर्यकांत डोळे (राष्ट्रवादी)
वॉर्ड क्र. ४४ भारती पाटील (राष्ट्रवादी)
वॉर्ड क्र. ४५ संगीता म्हात्रे (राष्ट्रवादी)
वॉर्ड क्र. ४६ शंकर मोरे (राष्ट्रवादी)
वॉर्ड क्र. ७९ - ऋचा पाटील (शिवसेना)
वॉर्ड क्र. 90 मीरा पाटील (काँग्रेस)
वॉर्ड क्र. 101 - सरोज पाटील (शिवसेना)