कोपरगावात राष्ट्रवादीचा हंडा मोर्चा

By admin | Published: June 13, 2016 11:10 PM2016-06-13T23:10:47+5:302016-06-13T23:15:15+5:30

कोपरगाव : राहाता, संगमनेर, श्रीरामपूर येथे पिण्याला पाणी आहे़ मात्र कोपरगावमध्ये वीस दिवसानंतर पाणी येते़ एप्रिल महिन्यात गोदावरी कालव्यांना आवर्तन आले़ साठ वेळा नळाला पाणी पुरवठा होईल,

Nationalist Party's Handa Morcha in Kopargaon | कोपरगावात राष्ट्रवादीचा हंडा मोर्चा

कोपरगावात राष्ट्रवादीचा हंडा मोर्चा

Next

कोपरगाव : राहाता, संगमनेर, श्रीरामपूर येथे पिण्याला पाणी आहे़ मात्र कोपरगावमध्ये वीस दिवसानंतर पाणी येते़ एप्रिल महिन्यात गोदावरी कालव्यांना आवर्तन आले़ साठ वेळा नळाला पाणी पुरवठा होईल, एवढे पाणी भरून घेण्यात आले़ परंतु आजवर केवळ सातच वेळा पाणी दिले गेले़ उर्वरित पाणी कुठे गेले़ टँकरवर फोटो चिटकवून जनतेची सहानुभूती मिळविण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या हंडा मोर्चाद्वारे करण्यात आला़
कोपरगाव नगरपालिकेवर सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हंडा मोर्चा काढण्यात आला़ मोर्चाचे नेतृत्व माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे, प्रदेश सचिव संदिप वर्पे व शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी केले़ डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघालेल्या मोर्चात महिला व पुरूष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़
नगरसेविका मायादेवी खरे यांनी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात राजकारण होत असल्याचा आरोप केला़ ठराविक लोकांनाच पाणी वाटप होते़ हेच टँकरचे पाणी जलकुंभात सोडून ते नळाद्वारे शहराला द्यावे, अशी मागणी केली़ राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस म्हणाले की, कृत्रिम पाणी टंचाई आहे़ माजी आ़ अशोक काळे यांनी पाच नंबरच्या तळ्यासाठी निधी आणला़ परंतु त्यांचे नाव होईल, म्हणून काम रखडविण्यात आले़ आता पाणी पुरवठा झाला नाही, तर सत्ताधारी नगरसेवकांच्या घरासमोर जाऊन मडके फोडू असा इशाराही त्यांनी दिला़ विजय आढाव यांनी टँकरवर फोटो लावून जनतेची सहानुभूती मिळविण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोप केला़
यावेळी योगेश जगताप, नगरसेवक कृष्णा आढाव, दिनार कुदळे, डॉ़ अतिष काळे, अ‍ॅड़ योगेश खालकर, नवाज कुरेशी आदींची भाषणे झाली़ मोर्चात वैशालीताई आढाव, शमीमबी कुरेशी, संतोष चवंडके, वर्षा गंगुले, सुमन भगत, केशरबाई साबळे, शितल लोंढे, नसिमा कुरेशी, शांताबाई लकारे, मनिषा कहार, मनिषा लकारे, रजनी इंगळे, मनिषा गंगुले, सागर लकारे आदी सहभागी झाले होते़
(प्रतिनिधी)

Web Title: Nationalist Party's Handa Morcha in Kopargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.