राष्ट्रवादी घेणार आत्मपरीक्षण बैठक

By admin | Published: May 18, 2014 12:10 AM2014-05-18T00:10:40+5:302014-05-18T00:10:40+5:30

काँग्रेसला केवळ दोन जागा मिळाल्या, आम्हाला निदान चार जागा राखता आल्या.

Nationalist will take self-test meeting | राष्ट्रवादी घेणार आत्मपरीक्षण बैठक

राष्ट्रवादी घेणार आत्मपरीक्षण बैठक

Next
>अतुल कुलकर्णी - मुंबई
काँग्रेसला केवळ दोन जागा मिळाल्या, आम्हाला निदान चार जागा राखता आल्या. त्यामुळे काय झाले, कसे झाले यावर चर्चा करण्यासाठी येत्या आठवडय़ात पक्षाचे नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेतली जाणार आहे. अद्याप बैठकीची तारीख निश्चित झाली नसली तरी दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीची बैठक 
सोमवारी होणार आहे. त्यात काय चर्चा होते हे पाहून राष्ट्रवादीच्या बैठकीची दिशा आणि तारीख ठरेल, असे सांगण्यात येत आहे.
या निवडणुकीत प्रचाराच्या दरम्यान राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी तीन विधाने केली होती. 1) आघाडीच्या राजकारणाला पर्याय नाही. 2) मला पंतप्रधान करा म्हणून मतं मागत फिरणा:यांचे स्वप्न कधीच पूर्ण होत नाही. 3) हा देश अध्र्या चड्डीवाल्यांच्या हाती द्यायचा आहे का? ही ती तीन विधाने होती. मतदारांनी मात्र या तीन विधानांचा त्यांच्या परीने अर्थ लावत मतदान केल्याने पवारांनी गेले सहा महिने निवडणुकांसाठी घेतलेली मेहनत वाया गेली आहे. 
पवारांनी प्रत्येक मतदारसंघ निहाय बैठका घेतल्या होत्या. उमेदवारांची नावे निश्चित केली होती. प्रत्येक आमदाराला लक्ष्य ठरवून दिले होते. तरीदेखील आलेल्या निकालाचे उत्तर पवारांना विचारायचे कोणी असा प्रश्न पक्षातल्या अन्य नेत्यांना पडला आहे. तळहाताच्या रेषेएवढा बारकाईने महाराष्ट्र माहिती असणा:या या जाणत्या राजाला मा त्यांनीच केलेल्या वरील तीन विधानांचा वेगळाच अर्थ मतदारांनी दाखवून दिला आहे. लोकांनी भाजपा-शिवसेनेला एवढे भरभरुन मतदान केले की आता मोदींना एनडीएमधल्या घटक पक्षांची देखील गरज उरलेली नाही. त्यामुळे आघाडीच्या राजकारणाला पर्याय नाही हे काही खरे नाही असे मतदारांनी दाखवून दिले आहे. 
‘मला पंतप्रधान करा’ असे म्हणत फिरणा:या मोदींना लोकांनी विजयी देखील केले आणि हा देश अर्धी चड्डी घालणा:या संघाच्या मुशीत तयार झालेल्या मोदींच्या हातीही देऊन टाकला आहे. पवारांना नेमके काय म्हणायचे असते आणि त्यातून काय साधायचे असते हे जसे राज्यातल्या भल्याभल्यांना कधी उमगलेले नाही तेच पुन्हा एकदा स्पष्ट झाले एवढेच.
मात्र काँग्रेस सोबत असणा:या सगळ्यांचे पानीपत झाले, आपले देखील तसेच होऊ नये यासाठी आपण आपला वेगळा मार्ग धरावा अशी मागणी पक्षात दबक्या आवाजातून पुढे येऊ लागली आहे. राज्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कायम राष्ट्रवादीला शत्रु समजून लक्ष्य केले. परिणामी आमच्यासाठी टाकलेल्या सापळ्यात अडकून त्यांचे तर नुकसान झालेच शिवाय आपले देखील झाले. त्यामुळे जे काय निर्णय घ्यायचा तो तातडीने घ्या असा दबाव देखील पक्षातून तयार केला जात आहे.
याबाबत प्रदेशाध्यक्ष भास्करराव जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, अजूनही आमची इच्छा काँग्रेससोबतच विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्याची आहे. कार्यकर्ते नाराजीतून काही बोलले असतील तर त्यांची नाराजी दूर केली जाईल. मात्र आम्ही नरेंद्र मोदी यांनी आखलेली व्यूृव्हरचना उलटवण्यात म्हणावे तेवढे यशस्वी ठरलो नाही हे देखील आपण मान्य करतो असेही जाधव म्हणाले. एक पैशाचे काम मतदार संघात न करणारे अनंत गिते निवडून येतात आणि अनेक कामे करणारे आमचे मंत्री सुनिल तटकरे अवघ्या काही मतांनी पडतात त्यामुळे आम्ही देखील चिंताक्रांत आहोत. या निकालाचा परामर्श पक्षीय पातळीवर घेतला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
सत्तेचा अमरपट्टा कोणी कायम घेऊन येत नसतो!
आम्ही काही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलो नाहीत. जी भीती निर्माण केली जात आहे तसे चित्र अजिबात नाही.  15 वर्षे ते देखील सत्तेच्या बाहेर होतेच ना! पण सत्ता हे परमसत्य नाही. फक्त तुमची भूमिका स्पष्ट पाहिजे. आमच्या पक्षाचे नेते पुढच्या आठवडय़ात एकत्र बसतील आणि यावर आत्मपरिक्षण करतील.
- जितेंद्र आव्हाड, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी

Web Title: Nationalist will take self-test meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.