राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा शिक्षणाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल
By admin | Published: August 1, 2016 10:16 PM2016-08-01T22:16:48+5:302016-08-01T22:16:48+5:30
शाळा सुरू होऊन एक महिना उलटल्यानंतरही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अद्यापही गणवेश उपलब्ध झाला नाही. सर्व शिक्षा अभियानाच्या नियमानुसार गणवेश
Next
id="yui_3_16_0_ym19_1_1470058039397_16224">ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १ - शाळा सुरू होऊन एक महिना उलटल्यानंतरही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अद्यापही गणवेश उपलब्ध झाला नाही. सर्व शिक्षा अभियानाच्या नियमानुसार गणवेश खरेदीचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला असतानाही शिक्षण विभागाक डून ठराविक कंत्राटदाराकडूनच खरेदी करावी, असे मौखिक आदेश मुख्याध्यापकांना मिळत आहेत. गणवेश खरेदीत शिक्षण विभाग भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शिक्षण अधिकारी प्राथमिक यांच्या कार्यालयावर हल्लाबोल करीत कार्यालयातील खुर्ची व नेमप्लेटची तोडफोड करून, शिक्षण अधिकाºयांना घेराव केला.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात जि.प. च्या एकूण १५६४ शाळा आहेत. यापैकी तब्बल ५६७ शाळांमध्ये अद्यापही गणवेश वाटप झाले नाही. एकाच ठिकाणावरून खरेदी करण्याची सक्ती केल्याने विद्यार्थ्यांना एकाच वेळी गणवेश मिळू शकला नाही. ही वस्तुस्थिती असताना शिक्षण विभाग कोणतीही चौकशी करण्यास तयार नाही. याचा जाब विचारण्याकरिता सलिल देशमुख व विशाल खांडेकर यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांची भेट घेण्यासाठी गेले होते. परंतु लोखंडे हे आपल्या कार्यालयास कुलूप लावून गायब होते. यामुळे रायुकाँचे कार्यकर्ते आक्रमक झाले. जोरदार नारेबाजी केली. तसेच खुर्च्यांची फेकाफेक केली. यामुळे येथे तणाव निर्माण झाला होता.