३० मे रोजी देशव्यापी औषधविक्री ठप्प होणार!

By admin | Published: May 15, 2017 06:32 AM2017-05-15T06:32:18+5:302017-05-15T06:32:18+5:30

देशभर औषधांच्या उत्पादनापासून खरेदी-विक्रीपर्यंत सर्वच बाबतीत गैरव्यवहार होत आहेत. या गैरव्यवहारांवर, बेकायदा औषध उत्पादन-खरेदी-विक्रीवर

The nationwide drug sale will be on May 30! | ३० मे रोजी देशव्यापी औषधविक्री ठप्प होणार!

३० मे रोजी देशव्यापी औषधविक्री ठप्प होणार!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशभर औषधांच्या उत्पादनापासून खरेदी-विक्रीपर्यंत सर्वच बाबतीत गैरव्यवहार होत आहेत. या गैरव्यवहारांवर, बेकायदा औषध उत्पादन-खरेदी-विक्रीवर अंकुश लावत, रुग्णांच्या जिवाशी चाललेला खेळ थांबवण्यासाठी अखेर केंद्र सरकारने ठोस पाऊल उचलले आहे. त्यानुसार, औषध उत्पादन-खरेदी-विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ई-पोर्टल तयार करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र, या पोर्टलला विरोध करण्याच्या मागणीसह अन्य मागण्यांसाठी आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट संघटनेने ३० मे रोजी एक दिवसीय संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.
ई-पोर्टलच्या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत असताना, आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट संघटना (एआयओसीडी) व महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने (एमएससीडीए) मात्र याला विरोध केला आहे. या विरोधात २९ मे रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते ३० मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत सुमारे ८ लाख औषधांची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
या संपाविषयी संघटनेचे सचिव अनिल नावंदर यांनी सांगितले की, केंद्राच्या पोर्टलला विरोध आहे, परंतु त्यासह औषधांच्या दुकानातील फार्मासिस्टची अनिर्वायता हटवा, औषध मूल्य नियंत्रण कायद्यामुळे होणारे केमिस्टचे शोषण थांबवा, याही प्रलंबित मागण्या आहेत. संपाविषयी आम्ही केंद्रीय आरोग्यविभाग, पंतप्रधान कार्यालय, गृहविभाग, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि अन्न व औषध प्रशासन विभाग यांना कळविले असल्याचेही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.औषधांच्या उत्पादनापासून ते रुग्णांच्या हातात औषध जाईपर्यंतची इत्थंभूत माहिती या ई-पोर्टलवर नोंदवणे, प्रत्येक कंपनीपासून केमिस्टपर्यंत सर्वांना बंधनकारक असणार आहे. कोणतेही औषध प्रिस्क्रिप्शनशिवाय विकता येत नाहीत. काही महत्त्वाच्या औषधांची शेड्युल एस, शेड्युल एच, शेड्युल एच-वन अशी वर्गवारी तयार करत, या औषधांच्या खरेदी-विक्रीसाठी कडक नियम तयार केले आहेत, पण हे नियम धाब्यावर ठेवत, औषधांच्या उत्पादनापासून खरेदी-विक्रीमध्ये गैरव्यवहार केले जात आहेत.
हीच परिस्थिती लक्षात घेत, या सर्व गैरव्यवहारांना चाप लावण्यासाठी केंद्र शासनाने ई-पोर्टलद्वारे औषध उत्पादन, खरेदी-विक्रीवर अकुंश लावण्याचा हा निर्णय स्वागतार्ह असून, रुग्णांच्या हितासाठी तर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक आहे. कंपनीने कोणती औषधे बनवली, किती बनवली, यापासून या औषधांचा रुग्णांच्या हातात जाईपर्यंतच्या प्रवासाची सर्व माहिती ई-पोर्टलवर नोंदवावी लागणार आहे. त्यामुळे नक्कीच औषधांचा काळाबाजार थांबणार आहे.

Web Title: The nationwide drug sale will be on May 30!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.