नटराजन चंद्रशेखरन बनले टाटा सन्सचे अध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2017 07:27 PM2017-01-12T19:27:00+5:302017-01-12T20:56:57+5:30

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक नटराजन चंद्रशेखरन यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली

Natrajan Chandrasekharan became the chairman of Tata Sons | नटराजन चंद्रशेखरन बनले टाटा सन्सचे अध्यक्ष

नटराजन चंद्रशेखरन बनले टाटा सन्सचे अध्यक्ष

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक नटराजन चंद्रशेखरन यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे टाटा सन्सला पहिल्यांदाच पारशी नसलेला व्यक्ती अध्यक्ष म्हणून लाभला आहे.

53 वर्षीय चंद्रशेखरन हे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. टीसीएस 2009पासून भारतातील सर्वात मोठी आउटसोर्सर कंपनी आहे. सायरस मिस्त्रींनी ऑक्टोबरमध्ये राजीनामा दिल्यानंतर टाटा सन्सच्या संचालकपदी नटराजन चंद्रशेखरन यांची नियुक्ती करण्यात आली होती. याचदरम्यान टीसीएसचा तिसऱ्या तिमाहीतला नफा जाहीर झाला. त्यामध्ये टीसीएसने 6778 कोटींचा निव्वळ नफा मिळवला आहे. दरम्यान, टाटा सन्सचे मुख्यालय मुंबई हाऊस येथे आज संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत नटराजन चंद्रशेखरन यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यावर संचालक मंडळाचं एकमत झालं आणि नटराजन चंद्रशेखरन अध्यक्ष झाले.

तत्पूर्वी चंद्रशेखरन यांच्या अध्यक्षतेखाली टीसीएसने प्रगती केली आहे. 2015-16मध्ये टीसीएसनं 16.5 डॉलर बिलियन महसूल मिळवला आहे. चंद्रशेखरन हे 1987ला टीसीएसमध्ये रुजू झाले. नटराजन यांनी तामिळनाडूच्या त्रिची या इंजिनीअरिंग कॉलेजमधून कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनमध्ये मास्टर्स केलं आहे. सायरस मिस्त्रींना हटवल्यानंतर तात्पुरते रतन टाटांना अध्यक्षपद सोपवण्यात आलं होतं आणि नव्या अध्यक्षाची निवड करण्यासाठी निवड समितीचीही स्थापना केली होती. या निवड समितीत रतन टाटा, वेनू श्रीनिवासन, अमित चंद्रा, रोनेन सेन, लॉर्ड कुमार भट्टाचार्य यांचा समावेश आहे. या निवड समितीनेच नटराजन चंद्रशेखरन यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. 

Web Title: Natrajan Chandrasekharan became the chairman of Tata Sons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.