‘प्राकृतिक इतिहास संग्रह’ आता आॅनलाइन
By Admin | Published: October 1, 2016 02:54 AM2016-10-01T02:54:42+5:302016-10-01T02:54:42+5:30
जगभरात २ ते ८ आॅक्टोबर हा वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातील वन्यपशू नमुना संग्रह गुगल आर्ट अॅण्ड कल्चरच्या
मुंबई : जगभरात २ ते ८ आॅक्टोबर हा वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातील वन्यपशू नमुना संग्रह गुगल आर्ट अॅण्ड कल्चरच्या माध्यमातून आपल्या भेटीस येत आहे. गेल्या महिन्यापासून गुगल आर्ट अॅण्ड कल्चर आणि छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने संग्रहालयातील प्राण्यांच्या नमुन्यांचा संग्रह दोन प्रदर्शनांच्या माध्यमातून जगभरातील निसर्गप्रेमींसाठी आॅनलाइन उपलब्ध झाला आहे.
गुगल आर्ट अॅण्ड कल्चरवरून प्राकृतिक इतिहास संग्रहाचा ठेवा प्रदर्शित करणाऱ्या भारतातील पन्नासहून अधिक संग्रहालयांपैकी छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय एक आहे. १६ देशांमधील नवीन संग्रह- गुगल आणि जगातील महत्त्वाच्या प्राकृतिक इतिहास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आता वेब युझर्स ॅ.ूङ्म/ल्लं३४१ं’ँ्र२३ङ्म१८ यावरही बघू शकतात. या प्रदर्शनातून अस्तित्वात नसलेल्या प्राण्यांचे, आभासी अस्तित्व निर्माण केले आहे.
गुगल आर्ट्स अॅण्ड कल्चर, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातील प्राकृतिक इतिहास विभागातील काही निवडक कलाकृती प्रदर्शित करत आहे, याचा आनंद आहे. ‘अॅनिमल इन इंडियन आर्ट’ या प्रदर्शनात भारतीय कलेच्या प्रदीर्घ इतिहासात प्राण्यांचे प्रतिनिधित्व आणि स्वीकृती याची झलक पाहायला मिळते. यातून भारतीयांची प्राणीजगताविषयीची संवेदना दिसून येते
- सब्यसाची मुखर्जी,
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, महासंचालक