निसर्ग संवर्धन मोठे आव्हान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 05:45 AM2017-12-31T05:45:45+5:302017-12-31T05:46:24+5:30
औद्योगिकीकरण थांबवायला हवे. मेट्रो किंवा कोणताही प्रकल्प आता केला जाऊ शकत नाही. दरवर्षी तापमान वाढणार आहे. मानवजातीच्या उच्चाटनाची प्रक्रि या येत्या ४-५ वर्षांत पृथ्वीवर सुरू होणार आहे.
- गिरीश राऊत
प्रदूषण हा जगभरात भेडसावणारा प्रश्न आहे. उद्योगधंदे वाढले, डोंगर पोखरले, सर्वत्र सिमेंटची घरे झाली, पावसाचे प्रमाणही कमी झाले, हवेत कार्बन वाढले, याचा परिणाम पर्यावरण ºहासात झाला. परिणामी, पर्यावरण संवर्धन हे मोठे आव्हान आहे. हिमस्खलनाची ही धोक्याची घंटा असून, आपण वेळेतच सावध होत पर्यावरण संवर्धनासाठी तत्परतेने पावले उचलली पाहिजेत, अन्यथा पृथ्वीचा विनाश होईल. २०२०मध्ये मानवजात वाचविण्यासाठी नियंत्रित करावयाच्या २ अंश वाढीची मर्यादा ओलांडली जाणार आहे. प्रत्येक वर्षी १/५ अंशाची वाढ पृथ्वीच्या सरासरी तापमानात होत असल्याने, मानवजात व जीवसृष्टी नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी, पर्यावरणाचे संवर्धन करणे हे आपल्यासमोरील आव्हान आहे.
नरिमन पॉइंट ते कांदिवलीपर्यंत २९.२२ किलोमीटर सागरी मार्ग म्हणजेच कोस्टल रोड बांधताना, पर्यावरणाची काळजी घेणे हे आपल्यासमोरचे आव्हान आहे. पर्यावरणाचा विचार करता, मुंबईच्या मातीची वैशिष्ट्ये लक्षात घेता, मुंबईतील मातीत रुजेल, वाढेल आणि अधिक घट्टपणे मूळ धरेल अशी झाडे लावणे गरजेचे आहे. तामण, बहावा, करंज, बकुळ, समुद्रफूल, कडुनिंब यासारखी झाडे लावली पाहिजेत, अशी झाडे लावणे आपल्यासाठी संधी आहे. गुलमोहर, सोनमोहर, पर्जन्य वृक्ष यासारखी झाडे लावणे शक्यतो टाळले पाहिजे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विकास आराखड्यात पर्यावरणाकडे संपूर्णत: दुर्लक्ष केले आहे. परिणामी, येथे पर्यावरणाचे संवर्धन करणे आपल्यासमोरील आव्हान आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने बांधण्यात येणाºया मुंबई ट्रान्स हार्बर लिंकदरम्यान पर्यावरणाची हानी होणार आहे. ही हानी रोखणे हे आव्हान आहे.
(लेखक पर्यावरणतज्ज्ञ आहेत.)