नाट्य परिषदेछा शरद पोंक्षे यांना दणका, प्रमुख कार्यवाहपदाचे अधिकार काढले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 10:26 AM2022-11-21T10:26:33+5:302022-11-21T10:27:20+5:30

मागील नियामक मंडळाची मुदत मार्च २०२३ मध्ये संपत आहे. पंचवार्षिक निवडणूक सन २०२३-२०२८ घेण्याचे नियामक मंडळ सभेत ठरविण्यात आले.

Natya Parishad action on Sharad Ponkshe was stripped of his powers | नाट्य परिषदेछा शरद पोंक्षे यांना दणका, प्रमुख कार्यवाहपदाचे अधिकार काढले

नाट्य परिषदेछा शरद पोंक्षे यांना दणका, प्रमुख कार्यवाहपदाचे अधिकार काढले

googlenewsNext

मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची तातडीची नियामक मंडळ सभा रविवारी झाली. त्यात बहुसंख्य नियामक मंडळ सदस्य उपस्थित होते.  प्रभारी अध्यक्ष नरेश गडेकर यांची सन २०१८ ते २०२३ या कालावधीतील उर्वरित कालावधीसाठी अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली. प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे हे परिषदेच्या घटनेप्रमाणे  कामकाज करीत नसल्याने त्यांचे प्रमुख कार्यवाह या पदाचे सर्व अधिकार सभेने काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. व त्यांचे सर्व अधिकार सहकार्यवाह यांना देण्यात आले.

मागील नियामक मंडळाची मुदत मार्च २०२३ मध्ये संपत आहे. पंचवार्षिक निवडणूक सन २०२३-२०२८ घेण्याचे नियामक मंडळ सभेत ठरविण्यात आले. यासाठीची मतदार यादी व घटनेप्रमाणे निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.  प्रमुख निवडणूक अधिकारी नियुक्तीबाबत सभेत चर्चा करण्यात आली. 

निवडणूक अधिकारी निवडीसाठी पाच सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. यात भाऊसाहेब भोईर, सविता मालपेकर, सुनील महाजन, विजय कदम, श्यामनाथ पुंडे असून सदर समिती पाच दिवसात निवडणूक अधिकाऱ्याचे नाव जाहीर करेल. तसेच येत्या काही दिवसात सर्वसाधारण सभा घेण्यात येईल, असे सर्वानुमते ठरले.  अध्यक्ष नरेश गडेकर सभेची तारीख व वेळ निश्चित करणार आहेत.
 

Web Title: Natya Parishad action on Sharad Ponkshe was stripped of his powers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.