निधी मिळविण्यात नाट्य परिषद उदासीन

By Admin | Published: February 8, 2015 11:24 PM2015-02-08T23:24:02+5:302015-02-08T23:24:02+5:30

नाट्य परिषदेला आर्थिक प्रश्नांमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असताना नाट्य परिषदेचे पदाधिकारी शासनाकडून निधी मिळविण्यास कमी पडत आहेत

The Natya Parishad neutralized to get funding | निधी मिळविण्यात नाट्य परिषद उदासीन

निधी मिळविण्यात नाट्य परिषद उदासीन

googlenewsNext

बेळगाव (बाळासाहेब ठाकरे नाट्य नगरी) : नाट्य परिषदेला आर्थिक प्रश्नांमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असताना नाट्य परिषदेचे पदाधिकारी शासनाकडून निधी मिळविण्यास कमी पडत आहेत, अशी थेट टीका शिवसेनेचे आमदार आणि नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य उदय सामंत यांनी केली आहे.
समारोप समारंभानिमित्त सामंत रविवारी बेळगावात आले. त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. रत्नागिरी येथील संमेलनात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाट्य परिषदेसाठी ५ कोटी रुपये देण्याची घोषणा केली, पण नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी ३ वर्षे यासाठी प्रयत्नच केले नाहीत.
शासनाकडून निधी मिळाल्यानंतर तो कसा खर्च करावा याचा आराखडा, नियोजनही झाले नसल्याने निधी मिळण्यासाठीचा प्रस्ताव परिषदेने राज्य शासनाकडे पाठविलाच नव्हता. निधी जाहीर केल्यानंतर वर्षभरानंतर याच प्रश्नावर अजित पवार यांनी कान उपटल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी ‘तत्काळ’ हालचाली करून सव्वातीन कोटी रुपये पदरात पाडून घेतले. अजूनही सव्वा कोटी रुपये परिषदेला मिळालेले नाहीत. परिषदेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याची टीका सामंत यांनी केली आहे. त्यामुळे कुठल्या शिर्षाखाली पैसा मागावा हे पदाधिकाऱ्यांना सांगता येत नसल्याचे ते म्हणाले. (खास प्रतिनिधी)

Web Title: The Natya Parishad neutralized to get funding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.