नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतक-यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 03:05 AM2017-09-25T03:05:50+5:302017-09-25T03:06:02+5:30

नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून बीड आणि परभणी जिल्ह्यांतील दोन शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले. माजलगाव तालुक्यातील गोविंदवाडी येथील बाबासाहेब शामराव नागरगोजे (४८) या शेतक-याने

Nauksiks, Suicide of Two Farmers, Who Hate Debtorism | नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतक-यांच्या आत्महत्या

नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतक-यांच्या आत्महत्या

Next

बीड/परभणी : नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून बीड आणि परभणी जिल्ह्यांतील दोन शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले.
माजलगाव तालुक्यातील गोविंदवाडी येथील बाबासाहेब शामराव नागरगोजे (४८) या शेतक-याने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. नागरगोजे यांना एक एकर जमीन असून, त्यातील कापूस पावसाअभावी जळून गेल्याने व मुलीच्या लग्नासाठीचे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक विवाहित मुलगी आहे.
दुसरी घटना परभणी तालुक्यातील आर्वी येथे घडली. सुदाम जनार्दन हरकळ (२२) या युवा शेतकºयाने शनिवारी रात्री शेतात कीटकनाशके प्राशन करून आत्महत्या केली.

यवतमाळमध्येही आत्महत्या
पोफाळी (यवतमाळ) : सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतक-याने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उमरखेड तालुक्यातील आंबाळी येथे घडली. शिवाजी भीमराव दांडेगावकर (३५) असे मृत शेतकºयाचे नाव आहे. त्याच्याकडे दीड लाख रुपये कर्ज असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Nauksiks, Suicide of Two Farmers, Who Hate Debtorism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी