नौदलाचे हेलिकॉप्टर कलंडले
By admin | Published: September 19, 2014 03:25 AM2014-09-19T03:25:32+5:302014-09-19T03:25:32+5:30
भारतीय नौदलाचे ‘आय एन 417 चेतक’ हे हेलिकॉप्टर गुरुवारी सकाळी 1क्.15च्या सुमारास अलिबाग येथे घसरून कलंडले.
Next
अलिबाग : भारतीय नौदलाचे ‘आय एन 417 चेतक’ हे हेलिकॉप्टर गुरुवारी सकाळी 1क्.15च्या सुमारास अलिबाग येथे घसरून कलंडले. तालुक्यातील रेवस बंदराजवळच्या मोरापाडा गावच्या किनारी इमजर्न्सी लॅन्डिग करताना हा अपघात घडला.
हेलिकॉप्टरचे पायलट कमांडर एस. श्रीधर हे गंभीर जखमी झाले, तर त्यांचे सहकारी कमांडर चैतन्य, रोहितकुमार पोईड व डी. के. सिंग हे किरकोळ जखमी झाले. रायगडचे पोलीस अधीक्षक डॉ. शशिकांत महावरकर व जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी ही माहिती दिली. अपघातानंतर नौदलाच्या मुंबईतील तळावरून दुसरे हेलिकॉप्टर मोरापाडा येथे दाखल झाले. सर्व जखमींना या हेलिकॉप्टरने नेव्हीनगरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे हेलिकॉप्टरदेखील मुंबईतील नौदल तळावर नेण्यात आले.
तांत्रिक बिघाड
हेलिकॉप्टरच्या इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्याने, इमजर्न्सी लॅन्डिग करावे लागले. त्या वेळी हेलिकॉप्टर घसरले. या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.