नवी मुंबई : फटाके उडवताना ड्रेस पेटल्याने चिमुरडीचा मृत्यू

By admin | Published: November 3, 2016 09:22 AM2016-11-03T09:22:16+5:302016-11-03T09:25:14+5:30

फटाका उडवताना ड्रेसवर ठिणगी उडून ड्रेसने पेट घेतल्याने ८ वर्षांच्या चिमुरडीला जीव गमवावा लागल्याची घटना नवी मुंबईतील कळंबोलीत घडली.

Navi Mumbai: The death of chimardi due to fracture in the dressing room | नवी मुंबई : फटाके उडवताना ड्रेस पेटल्याने चिमुरडीचा मृत्यू

नवी मुंबई : फटाके उडवताना ड्रेस पेटल्याने चिमुरडीचा मृत्यू

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी मुंबई, दि. ३ -  फटाके उडवताना जरा जरी निष्काळजीपणा झाला तर तो जीवावर बेतू शकतो. याचंच ताजं उदाहरण नवी मुंबईत पहायला मिळालं. फटाका उडवतानाच ड्रेसवर ठिणगी उडून ड्रेसने पेट घेतल्याने ८ वर्षांच्या चिमुरडीला जीव गमवावा लागला. कळंबोली येथे शनिवारी,  नरक चतुर्दशीच्या रात्री ही दुर्दैवी घटना घडली. अंकित चौधरी असे त्या मृत मुलीचे नाव आहे. 
अंकिता शनिवारी रात्री मित्र-मैत्रिणींसोबत फटाके उडवत होती. मात्र त्याचवेळी एक फटाक तिच्या अंगावर उडाला आणि तिच्या ड्रेसने पट घेतल्याने ती गंभीर जखमी झाली. तिच्या पालकांनी तिला तत्काळ ऐरोली येथील नॅशनल बर्न्स रुग्णालयात दाखल केले. मात्र सहा तासांच्य उपचारांनंतरही अंकिताची मृत्यूशी चाललेली झुंज अपयशी ठरली व तिचे रुग्णालयातच निधन झाले. रबाळे पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. 

Web Title: Navi Mumbai: The death of chimardi due to fracture in the dressing room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.