नवी मुंबई पोलिसांची वेबसाईट हॅक
By admin | Published: July 8, 2017 03:44 AM2017-07-08T03:44:20+5:302017-07-08T03:44:20+5:30
नवी मुंबई पोलिसांची वेबसाईट हॅक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. परंतु वेळीच हि बाब निदर्शनास आल्यानंतर अवघ्या एका
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांची वेबसाईट हॅक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. परंतु वेळीच हि बाब निदर्शनास आल्यानंतर अवघ्या एका तासात हॅक झालेली वेबसाईट पूर्ववत करण्यात आली. याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खंडणीसाठी जेएनपीटी च्या सर्व्हरवर झालेल्या सायबर हल्ल्याचा प्रकार नुकताच झालेला असताना नवी मुंबई पोलिसांचीच वेबसाईट हॅक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
रविवारी सकाळी ७.३० वाजण्याचा सुमारास नवी मुंबई पोलिसांची वेबसाईट हॅक झाली होती. हि बाब निदर्शनास येताच तात्काळ तज्ज्ञांच्या मदतीने ती हॅकर्सच्या तावडीतून सोडवल्याचे गुन्हे शाखा उपायुक्त तुषार दोशी यांनी सांगितले. तर हॅकर्सच्या या कारवाईमुळे सुमारे एक ते दिड तासासाठी नवी मुंबई पोलिसांची वेबसाईट ठप्प झाली होती. या कालावधीत वेबसाईट वरील महत्वाचा डेटा चोरीला गेला नसून वेबसाईटचे नुकसान देखील झालेले नसल्याचे दोशी यांनी सांगितले.