नवनीत राणा यांच्याकडून पहिलं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 21:28 IST2019-07-22T21:24:18+5:302019-07-22T21:28:25+5:30
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द

नवनीत राणा यांच्याकडून पहिलं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला
अमरावती : खासदार नवनीत राणा यांनी त्यांना मिळालेलं खासदारकीचं पहिलं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलं. राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मदतीचा धनादेश सुपूर्द केला. राज्य दुष्काळाच्या छायेत असल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे खासदारकीचं पहिलं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देत असल्याचं नवनीत राणांनी सांगितलं.
अमरावतीच्या खासदार असलेल्या नवनीत राणा यांनी त्यांचे पती आणि आमदार रवी राणा यांच्यासह वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी राणा दाम्पत्यानं जिल्ह्यातील पीक परिस्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली आणि तातडीनं मदत करण्याची मागणी केली. कमी पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट आहे. त्यामुळे त्वरित मदत करण्याची मागणी राणा यांनी केली.