नवनीत राणा बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाचा आज निकाल; याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 09:10 AM2024-04-04T09:10:01+5:302024-04-04T09:11:57+5:30

lok sabha election 2024 : अमरावती लोकसभा मतदारसंघातून आज नवनीत राणा (Navneet Rana) उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

Navneet Rana Bogus Caste Certificate Case Verdict Today; Attention of the political circle | नवनीत राणा बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाचा आज निकाल; याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

नवनीत राणा बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाचा आज निकाल; याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. अमरावतीमध्ये लोकसभेचा अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून आज नवनीत राणा (Navneet Rana) उमेदवारी अर्ज भरणार आहेत. नवनीत राणा यांना भाजपाने उमेदवारी जाहीर केली आहे. अशात नवनीत राणा यांच्या बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाचा निकाल आज लागणार आहे. त्यामुळे या महत्वपूर्ण निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र 2021 मध्ये अवैध ठरवले होते. त्यानंतर नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली होती. तसेच, बोगस जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणाचा दोनही गटाचा युक्तीवाद 28 फेब्रुवारीला पूर्ण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. आज याप्रकरणी अंतिम निकाल येणार आहे. त्यामुळे नवनीत राणा यांच्या उमेदवारीसाठी आजचा निकाल अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे.

दरम्यान, या प्रकरणाच्या निकालाचे वाचन ओपन कोर्टात होणार असून, निकाल वेबसाईटवर अपलोड केला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्णय दिला होता. याविरोधात नवनीत राणा या सर्वोच्च न्यायालयात गेल्या होत्या. नवनीत राणा यांच्या वडिलांनी दबाव टाकून बोगस शाळा सोडल्याचा दाखला जात प्रमाणपत्रासाठी दिल्याचे सिद्ध झाले होते. तसेच, उच्च न्यायालयातील अनेक तारखांना नवनीत राणा आणि त्यांचे वडील गैरहजर राहिले होते. नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

रश्मी बर्वेंच्याही जात वैधता प्रमाणपत्राचा आज निकाल
दुसरीकडे, काँग्रेसच्या नेत्या रश्मी बर्वे यांच्याही जात वैधता प्रमाणपत्राचा निकाल आज येणार आहे. आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात हा निकाल असणार आहे. रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र जात जात पडताळणी समितीने रद्द केल्यानंतर त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. बुधवारी सुनावणी घेत दोन्ही पक्षाच्या युक्तिवाद ऐकून घेत गुरुवारसाठी निकाल राखून ठेवला होता. 
 

Read in English

Web Title: Navneet Rana Bogus Caste Certificate Case Verdict Today; Attention of the political circle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.